Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: गोव्यात येणाऱ्या विमानात बॉम्ब? फ्लाईट जामनगरला वळवली, दाबोळीवर हाय अलर्ट

विमान रशियातील मॉस्को येथून गोव्याला येत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

दक्षिण गोव्यातील दाबोळी विमानतळावरून एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. दाबोळी विमानतळावर उतरणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय विमानात बॉम्ब असल्याचा एक फोन पोलिसांना आला असून, संबधित फ्लाईट जामनगर, गुजरात येथे वळविण्यात आली आहे. या फ्लाईटमध्ये 244 प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान रशियातील मॉस्को येथून गोव्याला येत होते.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या फ्लाईटचे जामनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. जामनगर जिल्ह्यातील सर्व उच्च अधिकारी विमानतळावर पोहोचले आहेत. फ्लाइटमध्ये अनेक परदेशी प्रवासी आहेत. जामनगर येथील प्रशासकीय अधिकारी, पोलिस यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, विमानाची तपासणी सुरू आहे. सध्या जामनगर विमानतळाच्या आत बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. जामनगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांसह अधिकारी विमानतळावर पोहोचले आहेत.

गोवा पोलिस देखील या घटनेमुळे सतर्क झाले असून, दाबोळी विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, पोलिसांची उच्च बैठक देखील सध्या सुरू आहे.

दरम्यान, जामनगर येथे विमानाचे 9.49 वा सुरक्षित लॅन्डिंग करण्यात आले असून, सध्या हे विमान आयसोलेशन मध्ये आहे. सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT