Goa: Six arrested for poaching monitor lizards at Dharbandora 
गोवा

Goa Crime: साताऱ्यातील खूनप्रकरणी पाच संशयितांना गोव्यात अटक

अज्ञाताचा खून करून गुरुवारपासून बार्देश येथील किनारी भागात दडून बसलेल्या महाराष्ट्रातील एकूण पाच संशयितांच्या मुसक्या पोलिसांकडून आवळण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Crime: सातारा-महाराष्ट्र येथे अज्ञाताचा खून करून गुरुवारपासून बार्देश येथील किनारी भागात दडून बसलेल्या महाराष्ट्रातील एकूण पाच संशयितांच्या मुसक्या पोलिसांकडून आवळण्यात आल्या आहेत.

गुरुवारपासून त्यांचा मुक्काम हणजूण पोलिस कक्षेत येणाऱ्या हडफडे येथे एका खासगी गेस्ट हाउसमध्ये होता. खुनाची घटना 24 जानेवारीला घडली होती. ही कारवाई हणजूण पोलिस तसेच गुन्हा अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी करण्यात आली.

हणजूण पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महाराष्ट्रातील सातारा तालुका पोलिस क्षेत्राच्या कक्षेत ही खुनाची घटना जानेवारी महिन्यात घडली होती.

24 जानेवारीला सातारा (महाराष्ट्र) तालुका पोलिस स्थानकात या खुनाच्या घटनेशी संबंधित आर्म ॲक्ट कायद्यानुसार संशयित सूरज कदम (26, खेड-सातारा), अभिषेक चतुर (27, नंदगिरी-कोरेगाव-सातारा), शुभम चतुर (27, चिकली-पुणे), राजू पवार (26, सातारा), सचिन चव्हाण (29, मुळशी-पुणे) यांच्याविरोधात रितसर तक्रार दाखल करण्यात आली होती.

या खून प्रकरणात सहभागी सर्वच्या सर्व पाचही संशयितांनी खुनाच्या घटनेनंतर बार्देशातील हडफडे येथे गुरुवारपासून मुक्काम ठोकला होता. दरम्यान, या खुनाच्या घटनेनंतर सातारा पोलिस संशयितांच्या मागावर होते.

पाचही संशयित गोव्यात पोहोचल्याची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिस कक्षाकडून तत्काळ हणजूण पोलिस तसेच गुन्हा अन्वेषण विभागाशी संपर्क करण्यात आला व तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली.

तपासासाठी दोन पथके

यासंबंधात माहिती मिळताच, हणजूण पोलिस तसेच गुन्हा अन्वेषण विभागाकडून दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली व संशयितांचा शोध घेत असता बार्देशातील हडफडेत संशयितांकडून वापरण्यात आलेली बोलेरो-जीपगाडी पोलिसांच्या दृष्टीस पडली.

यावेळी सावध पवित्रा घेतलेल्या पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत हडफडे येथे आश्रय घेतलेल्या सर्वच्या सर्व पाचही संशयितांचा माग घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT