Mineral Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining : आणखीन पाच खनिज पट्टे लिलावासाठी खुले होणार

सरकारकडून पहिल्या टप्प्यात चार खनिज ब्लॉक्‍सची यशस्वी विक्री

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mining : राज्य सरकारच्या खनिज आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वतीने पहिल्या चार खनिज ब्लॉक्‍सची यशस्वी विक्री केल्यानंतर आता आणखी 5 ब्लॉक्स विक्रीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्‍यात अडवलपाल-थिवी, कुडणे-करमळे, कुडणे, थिवी-पीर्ण, सुर्ल-सोनशी या ब्लॉक्सचा समावेश आहे.

27 मार्चपर्यंत बोलीधारकांना आपल्या निविदा दाखल करता येतील. खाण खात्याने पहिल्या टप्प्यात डिचोली, शिरगाव-मये, मोंत द शिरगाव या उत्तर गोव्यातील तीन आणि दक्षिण गोव्यातील काले अशा एकूण चार ब्लॉक्सचा ई-लिलाव पूर्ण केला आहे.

डिचोली ब्लॉक सेझा (वेदांता) कंपनी, शिरगाव-मये ब्लॉक साळगावकर शिपिंग प्रा. लि. कंपनी, मोंत द शिरगाव ब्लॉक बांदेकर माईन कंपनी तर काले ब्लॉक फोमेंतो कंपनीने सर्वाधिक बोली लावून आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळविले आहे. ई-लिलाव पूर्ण झाल्याने आता सर्वांना खाणी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT