Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

Goa Casino Director Shooting Case: उत्तर प्रदेशातून मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळत गोवा गुन्हे शाखेने गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सुटकेचा निश्वास टाकला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यभरात सुरक्षेचा कडक बंदोबस्त तैनात असतानाच, पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुख्य शूटरला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

उत्तर प्रदेशातून मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळत गोवा गुन्हे शाखेने गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सुटकेचा निश्वास टाकला आहे. उत्तर प्रदेशातून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना संशयित शूटर बाबू ऊर्फ इसार अली (३५, रिशिया) याला उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने अटक केली. यापूर्वी काझू अलाउद्दीन शेख, इसरार अली अहमद व सूरज आचार्य यांना अटक केली होती. सर्व संशयित पोलिस कोठडीत आहेत.

उत्तर प्रदेशातून १३ सप्टेंबर रोजी बाबू याला ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणण्यात आले. म्हापसा न्यायालयाने संशयिताला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.४७ वा. हॉटेल निओ मॅजेस्टिकचे संचालक श्रीनिवास नायक आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी निघत असताना दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. नायक यांच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत तीन राउंडचा प्रत्युत्तरी गोळीबार केला होता. दरम्यान, दोन्हीकडून होणाऱ्या गोळीबारात हल्लेखोर पळून गेले होते.

याप्रकरणाची लगेच दखल घेत पर्वरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आणि तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखेने शूटर बाबू याची ओळख पटवून उत्तर प्रदेश ‘एसटीएफ’ची मदत घेतली. पोलिसांनी संयुक्तपणे नेपाळ सीमेजवळ सापळा रचून बाबू याला बेड्या ठोकल्या.

अशा घडल्या घडामोडी

पोलिस चौकशीदरम्यान बाबू याने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये तळोजा मध्यवर्ती कारागृहात (नवी मुंबई) भावाला भेटायला जात असताना त्याची ओळख ‘अण्णा’ नावाच्या कैद्याशी झाली होती. २०२४ मध्ये सुटका झाल्यानंतर अण्णाने गोव्यात व्यवसाय सुरू केला. जानेवारी २०२६ मध्ये बाबू गोव्यात अण्णाकडे कामाला आला. अण्णाने ३ पिस्तूलची व्यवस्था करत एका ‘मोठ्या व्यक्तीचा’ गेम करण्यासाठी बाबूला ५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. पैशांच्या लालसेने बाबूने अण्णासोबत मिळून श्रीनिवास नायक यांच्यावर गोळीबार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT