Drishti Lifesavers Rescue Drishti Lifesavers
गोवा

Russian In Goa: समुद्रात पोहणं बेतलं असतं जीवावर; गोव्यात 5 रशियन महिला पर्यटकांना जीवदान

Drowning Case Candolim Benaulim: कांदोळी येथील समुद्रात तीन रशियन महिलांना वाचविले. ३० ते ४० वर्षे वयाच्या महिला एकत्र पोहत असताना रिप करंटमध्ये अडकल्या.

Pramod Yadav

कांदोळी: समुद्रात पोहणाऱ्या पाच रशियन महिला पर्यटकांना दृष्टीच्या जीवरक्षकांनी जीवदान दिले आहे. कांदोळी आणि बाणावली येथे पर्यटक महिला अडकून पडल्या होत्या. पोहता पोहता रिप करंट येथे महिला अडकून पडल्या. जीवरक्षकांनी तात्काळ महिलांना मंगळवारी (१० डिसेंबर) बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदोळी आणि बाणावली येथे समुद्रात बुडणाऱ्या पाच रशियन महिलांचे प्राण 'दृष्टी मरीन'च्या जीवरक्षकांनी वाचविले. कांदोळी येथील समुद्रात तीन रशियन महिलांना वाचविले. ३० ते ४० वर्षे वयाच्या महिला एकत्र पोहत असताना रिप करंटमध्ये अडकल्या. जीवरक्षक कार्तिक नाईक यांनी त्वरित मदतीसाठी धाव घेतली.

रेस्क्यू बोर्डचा वापर करून त्यांनी या तिन्ही महिलांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. बाणावली येथील समुद्रात ५१ आणि ५२ वर्षांच्या दोन रशियन महिला रिप करंटमुळे समुद्रात ओढल्या गेल्या. जीवरक्षक स्वप्नील फराडे यांनी एका महिलेला रेस्क्यू ट्यूबच्या साहाय्याने तर दशरथ सांगोडकर आणि समित यांनी दुसऱ्या महिलेला सुरक्षित बाहेर काढले.

समुद्रात पोहताना काळजी घ्या - दृष्टी मरीन

समुद्रात पोहताना काळजी घेण्याचे आवाहन दृष्टी मरीन'च्या वतीने करण्यात आले आहे. समुद्राच्या भागात लावलेल्या सूचनांकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन त्याचे पालन करावे. धोकादायक आणि मनाई केलेल्या क्षेत्रात जाऊ नये तसेच जीवघेणे स्टंट करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT