kulem Vasco Railway Dainik Gomantak
गोवा

Madgaon : कुळे-वास्को रेल्वेखाली सापडून पाच गुरे दगावली; मडगाव येथील घटना

अशा घटना येथील रेल्वे ट्रॅकवर पूर्वी देखील घडल्या आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव येथे प्रवासी रेल्वेखाली सापडून 5 गुरे दगावण्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी मडगाव येथील एका कॉलेज जवळील रेल्वे ट्रॅकवर घडली. या प्रकारामुळे कुळे-वास्को प्रवासी रेल्वे काही वेळ थांबविण्यात आली होती.

दरम्यान रेल्वे काही काळ थांबविल्यामुळे रेल्वे वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुळे-वास्को प्रवासी रेल्वेखाली सापडून पाच गुरे दगावण्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे काही वेळ कुळे-वास्को रेल्वे तेथेच थांबविण्यात आली होती. रेल्वेखाली सापडलेली गुरे हटविल्यानंतर गाडीने वास्कोकडे प्रयाण केले.

अशा घटना येथील रेल्वे ट्रॅकवर पूर्वी देखील घडल्या आहेत. त्यावर उपाय योजना आखावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. या पूर्वी या भागात भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वे खाली सापडून दोन रेडे ठार झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: CM पदाच्या शर्यतीत भंडारींपैकी कोणाचेच नाव नाही! रवी नाईकांनंतर भंडारी समाजात 'मॅग्नेटिक' नेत्याचा दुष्काळ; 2027 च्या निवडणुकीत कुणाचे भवितव्य पणाला?

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

SCROLL FOR NEXT