Risky Bike Stunts Dainik Gomantak
गोवा

Risky Bike Stunts: बाईक स्टंट करणे भोवले; वेर्णा, म्हापसा आणि कुडचडे येथून पाच जणांना अटक

बाईकवरून धोकादायक स्टंट केल्याप्रकरणी वेर्णा, म्हापसा आणि कुडचडे येथून पाच जणांना अटक करण्यात आली आहे

Pramod Yadav

Risky Bike Stunts In Goa: बाईकवरून धोकादायक स्टंट केल्याप्रकरणी वेर्णा, म्हापसा आणि कुडचडे येथून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे तरूण बाईकवरून जीवघेणे स्टंट करत स्वत: आणि इतरांचा जीव धोक्यात घालत होते. पोलिसांनी तरूणांकडून त्यांच्या बाईक देखील जप्त केल्या आहेत.

(Five arrested for performing risky bike stunts in Verna, Mapusa And Curchorem)

वेर्णा पोलिसांनी औद्योगिक वसाहतीत आयएफबी प्लान्टजवळ दुचाकीवरून स्टंट करताना सुफियान डिंगर (वय 22, केपे), साहिल बांदोडकर (वय 25, रा. कुडचडे), लिएंडर कुतिन्हो (वय 20) यांना वेर्णा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून निन्जा, केटीएम ड्यूक आणि केटीएम आरसी या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.

म्हापसा पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यावर दुचाकीवरून स्टंट केल्याप्रकरणी यासिन मुल्ला (वय 20) याला अटक केली आहे. तसेच, कुडचडे येथे एका युवकाला बाईकवरून स्टंट केल्याप्रकरणी अटक केलीय.

असे एकूण पाच जणांना जीवघेणे स्टंट करत इतरांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी वेर्णा, म्हापसा आणि कुडचडे येथून अटक कलीय. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, वेर्णा, म्हापसा आणि कुडचडे येथे सार्वजनिक रस्त्यावर काही तरूण धोकादायक पद्धतीने स्टंट करत होते. याप्रकरणी व्हिडिओ देखील समोर आले होते. पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत, कारवाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT