Fishing Boats Fire Dainik Gomantak
गोवा

Fishing Boats Fire: मच्छीमारी बोटींना आग; संशयित आरोपी अटकेत

पूर्ववैमनस्यातून आग लावण्याचा हा प्रकार घडला होता

गोमन्तक डिजिटल टीम

Fishing Boats Fire in Goa: बाणावली येथे बोटींना व मासेमारी जाळ्‍यांना आग लावल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी रोफिलियो फर्नांडिस या युवकाला अटक केली.

तो वाडी-बाणावली येथील रहिवाशी आहे. या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी ट्रेझर फर्नांडिस या मुख्‍य आरोपीच्‍याही मुसक्‍या आवळल्‍या.

गेल्‍या 26 फेब्रुवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास वाडी-बाणावली येथील समुद्रकिनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या दोन बोटींना आग लावण्याचा प्रकार घडला होता. त्‍यात बोटमालकांचे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

या प्रकरणी कोलवा पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्‍यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून आग लावण्याचा हा प्रकार घडला होता.

स्थानिक आमदार व्‍हेंझी व्हिएगस यांनीही या प्रकरणी लक्ष घालून तपास करण्याची मागणी केली होती. सासष्टीचे उपअधीक्षक संतोष देसाई अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT