Cashew
CashewDainik Gomantak

Cashew Plantation in Goa: काजूच्‍या पिकाला होतेय कीडीची लागण!

बागायतदार चिंतेत : हवामानबदलाचाही होतोय परिणाम; उत्‍पादनात मोठी घट
Published on

Pest on Cashew Plantation in Goa: जागतिक बाजारपेठेत गोव्यातील काजूला प्रचंड मागणी आहे. गोव्यात येणारा प्रत्येक पर्यटक किमान एक तरी काजूचे पाकीट घेऊन जात असतो. परंतु कीडीच्या प्रादुर्भावामुळे काजूच्या झाडांवर विपरित परिणाम होत आहे. त्‍यामुळे काजू बागायतदार चिंता व्यक्त करत आहेत. सातत्याने घडणाऱ्या हवामानबदलांमुळे तसेच कीडींमुळे झाडांची हानी होऊन उत्पादन घटत आहे.

भारत हा कृषीप्रधान देश. ज्याप्रमाणे प्रत्येक राज्याची भाषा, संस्कृती, परंपरा वेगळी तसेच प्रत्येक राज्यात ऋतुकालाप्रमाणे वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेतले जाते. गोव्याच्या अनुषंगाने विचार करता नारळ, सुपारी, केळी आणि काजू हे प्रमुख्याने घेतले जाणारे उत्पन्न आहे.

अनेक कुटुंबीयांची उपजीविका या पिकांवर अवलंबून आहे. फेब्रुवारी ते मे या कालखंडात काजूचे उत्पादन घेतले जाते. परंतु या पिकावर हवामान बदल व विविध प्रकारच्या कीडींच्या प्रादुर्भाभावामुळे विपरित परिणाम होत आहे.

तात्काळ करावयाची उपाययोजना

काजूच्या झाडाच्या ज्या भागात चीक आलेला दिसेल, तो भाग कोयत्याच्या साहाय्याने स्वच्छ करावा. त्यानंतर झाड पोखरून कीड बाहेर काढून नष्ट करावी.

त्यात क्लोरोपयारीफोस 10 मिली एक लिटर पाण्यात किंवा फिप्रोनील 2 मिली एक लिटर पाण्यात घालून पोखरलेल्या भागात सोडावे. तसेच हा द्रावण चुना पोखरलेल्या भागात लावावा. तसेच काही प्रमाणात झाडाच्या आजूबाजूस ते पाणी शिंपडावे.

ज्या काजूच्या झाडांना कीड लागून पाने पिवळी झालेली असतात, अशी झाडे कापून ती जाळून टाकावीत. तसेच त्यातील कीड देखील नष्ट करावी.

Cashew
Goa Mining Case: गोवा फाऊंडेशनने जपले गोंयकारपण

झाडाला कीड कशी लागते?

काजूच्‍या झाडाला जी कीड लागते, त्यास स्टीम ॲण्ड रूट ब्रोटर संबोधतात. झाडाला कीड लागली असेल तर पहिल्यांदा त्या झाडातून चीक येऊ लागतो. त्यानंतर काही दिवसांनी भुसा येतो आणि पाने पिवळी होऊ लागतात.

तसेच फांद्या सुकू लागतात. झुरळासारखी दिसणारी ही कीड झाडावर तांदळासारखी दिसणारी अंडी घालते. अंडी घातल्यानंतर पाच ते सात दिवसांनंतर त्यातून कीडे बाहेर येतात आणि ते झाडाच्‍या सालीला पोखरून आत प्रवेश करतात. आठ ते दहा महिने कीड झाड पोखरते.

Cashew
Bauxite Transport: वास्‍कोत आता बॉक्साईटचा मारा!

काजूच्‍या झाडांना लागणाऱ्या कीडीवर योग्य वेळी उपाययोजना केली नाही तर ती इतर झाडांना लागू शकते. तिचा सर्वत्र प्रसार होऊ शकतो. त्यामुळे कीड मारून औषधाचा फवारा केला पाहिजे. काजूला प्रामुख्याने पावसाळ्यात कीड लागते. म्‍हणून शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेतली पाहिजे.

- नेविल आल्फोन्सो, कृषी संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com