Fishing Ban in Goa Dainik Gomantak
गोवा

Fishing Ban: मासेमारी बंदी 90 दिवसांपर्यंत वाढवावी; विविध संघटनांची मागणी

हलगर्जीपणा केल्यास किनारपट्टीलगतच्या मच्छीमारांवर येईल विस्थापनाची वेळ

दैनिक गोमन्तक डिजिटल

Fishing Ban: नॅशनल फिश वर्कर्स फोरमने मॉन्सून काळात पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंदी संपूर्णपणे अंमलात आणावी. तसेच पुढील मान्सूनमध्ये ही बंदी 90 दिवसांपर्यंत वाढवावी, अशी मागणी केली आहे.

गोएंचो रापोणकरांचो एकवोट, नॅशनल फिशवर्कर्स फोरम व इतर संघटनांनी खारीवाडा वास्को येथे जुन्या क्रॉस ऑफिसमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी एनआरएफ चे सचिव ओलेन्सियो सिमोईस, गोएंचो रापोणकरांचो एकवोटचे उपाध्यक्ष कॅमिलो सौझा, क्रिस्तोद डिसोजा आदी उपस्थित होते.

ओलेन्सियो सिमोईस म्हणाले, गोवा हे एकमेव राज्य आहे जे मान्सूनमधील मासेमारी बंदी खऱ्या अर्थाने अंमलात आणत नाही. त्यामुळे आपण सागरी प्रजाती गमावत आहोत. हलगर्जीपणाने वागल्यास गोव्यात किनारपट्टीलगत राहणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांच्या विस्थापनाला सामोरे जावे लागू शकते.

भारत हा जगातील मासळीचा प्रमुख ग्राहक आणि पुरवठादार आहे. मान्सूनमधील मासेमारी बंदी वाढवणे आवश्यक आहे.

मच्छीमारांनी कायदा हातात घेण्यापूर्वी मालफे येथील बेकायदेशीर हायस्पीड ट्रॉलर्सना प्रवेश बंदी करा, अशी मागणी नॅशनल फिशवर्कर्स फोरमने केली.

एलईडी लाईट फिशिंगवरील बंदी लागू करण्यात अपयशी ठरल्याबद्दल गोएंचो रापोणकरांचो एकवोटचे उपाध्यक्ष कॅमिलो सौझा यांनी विभागाला इशारा दिला. बंदीचे सर्रास उल्लंघन केले जात असून, मत्स्य विभागाने याकडे डोळेझाक केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT