Goa Fishing Ban  Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing Ban: गोव्यात एक जूनपासून मासेमारी बंदी! 31 जुलैपर्यंत सर्व जेटी बंद राहणार; पारंपरिक मच्छीमारांना सशर्त सवलत

Fishing rules in Goa: पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांना यातून सवलत दिली आहे. त्यांनी लहान होड्यांद्वारे मासेमारी सुरू ठेवली तरी सर्व नियमांचे पालन बंधनकारक आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्यातील मासेमारीवर १ जूनपासून ३१ जुलैपर्यंत बंदी लागू करण्यात आली आहे. या काळात समुद्रात मोठ्या नौकांद्वारे व्यावसायिक मासेमारीवर बंदी राहणार असून, सर्व जेटी बंद राहणार असल्याची माहिती मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी दिली.

मंत्री हळर्णकर म्हणाले की, जून-जुलै हे महिने मासे पुनरुत्पादनासाठी महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि माशांचे संवर्धन होण्यासाठी दरवर्षी ही बंदी लागू केली जाते.

मात्र, पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांना यातून सवलत दिली आहे. त्यांनी लहान होड्यांद्वारे मासेमारी सुरू ठेवली तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन बंधनकारक आहे.

प्रत्येक जेटीवर मत्स्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे का, यावर नजर ठेवली जाईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी काळात वादळाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे समुद्रात जाण्यापूर्वी मच्छीमारांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही मंत्री हळर्णकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT