Goa News | Fishing Dainik Gomantak
गोवा

Nilkanth Halarnkar on Fisheries: ...तर खाण उद्योगाप्रमाणे 'या' क्षेत्रात होऊ शकते गोव्याची भरभराट

राज्यातील युवकांनी या क्षेत्राकडे सकारात्मकपणे पाहणे गरजेचे

दैनिक गोमन्तक

गोव्यातील तरुण पिढीने मासे क्षेत्राची करियर म्हणून निवड करत नवी कौशल्ये आत्मसात केल्यास मासेमारी उद्योग राज्याची अर्थव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत करु शकतो असा विश्वास मच्छीमारमंत्री निळकंठ हळर्णकर यांनी व्यक्त केला.

(Fisheries minister Nilkanth Halarnkar Said Goan economy can be majorly dependent on fishing)

पणजी येथे मच्छीमारमंत्री निळकंठ हळर्णकर यांनी आज एका कार्यक्रम प्रसंगी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री हळर्णकर यांनी गोवा राज्यासाठी मासेमारी व्यवसायाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, गोवा राज्यातील युवकांनी या क्षेत्राकडे सकारात्मकपणे पाहात मासेमारीची कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. यामुळे युवकांसह राज्याची अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते. मात्र युवकांनी या क्षेत्रात अभिरुची दाखवणे गरजेचे असल्याचं ते म्हणाले.

मंत्री हळर्णकर पुढे बोलताना म्हणाले की, गोवा राज्याच्या अर्थव्यस्थेचा कणा म्हणून सध्या खाण उद्योगाकडे पाहीले जाते. खाण उद्योग राज्याच्या तिजोरीत ज्याप्रमाणे भर घालतो आहे. त्याप्रमाणे भविष्यात गोव्यातील मासेमारी क्षेत्र ही अनेक कष्टकऱ्यांचे संसार उभा करु शकतो तसेच राज्याच्या तिजोरीत ही मोठी भर टाकू शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

....याची मोठी किंमत राज्याला मोजावी लागू शकते

मासेमारीला ओरबाडणारे उद्योग चालू ठेवल्यास याची मोठी किंमत राज्याला मोजावी लागू शकते. त्यामुळे मासेमारीसाठीचे अवैध प्रकार वेळीच थांबवले गेले. व अधिक उत्पादन वाढवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची जोड दिल्यास याचा फायदा नक्की होऊ शकतो असे ही ते म्हणाले.

यावेळी मंत्री हळर्णकर यांनी आवाहन केले की, या क्षेत्रात उच्च शिक्षित तरुणांनी आपले कौशल्य पणाला लावत या क्षेत्रात यावे. यामुळे गोवा राज्याला मासेमारी क्षेत्रात चांगले दिवस येऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Disability Pension: 13 वर्षांपासून मानधन जैसे थे! दिव्यांगांना 8 हजार मानधन द्या; गोवा दिव्यांग हक्क संघटनेची मुख्यमंत्र्याांकडे मागणी

Konkan Ganesh Festival: गावी जाता येणार मोफत! गणेशोत्सवासाठी दादर ते कुडाळ स्पेशल एक्सप्रेस धावणार; पाहा संपूर्ण Time Table

Investment Fraud: जमीन खरेदी, पेन्शन योजना अन् क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली गुंतवणूक... 18.35 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कोर्टानं फेटाळला चौघांचा जामीन

Shani Gochar 2026: शनिदेवांची उलटी चाल अन् नक्षत्र बदल! 'या' राशींना नोकरीत बसणार मोठा फटका; आयुष्यात सुरु होणार संघर्ष

Independence Day Wishes In Marathi: स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! 15 ऑगस्टचा आनंद प्रियजनांसोबत करा खास; पाठवा 'हे' सुंदर संदेश

SCROLL FOR NEXT