Cage Farming Norway The Fish Site
गोवा

इकडे 'पैसे नाहीत' म्हणून अनुदान नाही, तिकडे मंत्र्यांचा नॉर्वेला 'अडीच कोटींचा' दौरा का? मच्छीमारांचा संतप्त सवाल

Norway Tour: शिष्टमंडळात पारंपरिक मच्छीमारांना समाविष्ट न करता व्यावसायिक ट्रॉलरवाल्याला का घेतले हाही सवाल

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: एका बाजूने पैसे नसल्याचे कारण दाखवून मच्छीमारना अनुदानाच्या पैशांपासून वंचित ठेवले असताना मच्छीमार खात्याचे मंत्री आणि संचालक सरकारी पैशांनी नॉर्वेचा दौरा कसा करू शकतात, असा सवाल स्थानिक मच्छीमार करू लागले आहेत. त्यामुळे हा दौरा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

२६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत नॉर्वेमधील विविध ठिकाणी मच्छीमार खात्याचे मंत्री आणि अधिकारी तसेच खासगी मत्स्यव्यावसायिकांचा सहभाग असलेल्या चमूने यावर्षी पाच दिवसांच्या सहलीचा आनंद लुटला.

त्यात मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर, मच्छीमार खात्याच्या संचालक शमिला मोंतेरो, मंत्र्यांचे ओएसडी प्रथमेश तुळसकर तसेच खासगी मत्स्य व्यवसायिक मिंगेल रॉड्रिग्ज, त्यांचे पूत्र जॉयस्टन यांचा सामावेश होता. रॉड्रिग्स हे मासेमारी करणारे मोठे उद्योजक आहेत आणि एलईडी फिशिंगचे कट्टर समर्थक आहेत. त्यांची जोकॉन्स मरीन एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर कंपन्या असून त्यांची स्वतःची खासगी जेटीही आहे.

दरम्यान, नार्वेचा हा दौरा ‘केज फार्मिंग’ चा अभ्यास करण्यासाठी आयोजित करण्यात आल्यो सांगितले जात असेल तर त्या शिष्टमंडळात पारंपरिक मच्छीमारांना समाविष्ट न करता रॉड्रिग्जसारख्या ट्रॉलरवाल्याला का घेतले, असा सवाल कुटबन जेटीवरील मच्छीमार साविओ डिसिल्वा यांनी केला. ज्या शासकीय जेटींवर पारंपारिक मच्छीमार अवलंबून आहेत, त्या सर्व सुविधांअभावी पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत आहेत त्या सुधारण्यासाठी पैसा खर्च करण्याऐवजी या दौऱ्यावर अडीज कोटी रुपये खर्चून मच्छीमार खत्याने असा काय अभ्यास केला, असा सवाल डिसिल्वा यांनी केला.

निधीच्या कमतरतेमुळे आम्हाला आमचे अनुदान वितरित केले गेले नाही आणि सरकार लाखो खर्च करू शकते अशा सहलीसाठी ज्याचा आम्हा रापणकरांना काहीही फायदा होणार नाही, अशी प्रतिक्रीया या संघटनेचे पदाधिकारी ओलेंसीयो सिमोइस यांनी व्यक्त केली. या दौऱ्याची चौकशी होण्याची गरज त्यांनी व्यक्तकेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT