Goa News |Fish Dainik Gomantak
गोवा

Goa Fish Market: गोव्यात मासळी महागली!

राज्यात नोव्हेंबर तसेच डिसेंबरच्या पूर्वार्धात शंभर रूपयांना वीस बांगडे मिळत होते, परंतु आता तेच बांगडे 200 रुपये किलो दराने विकले जात आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात नोव्हेंबर तसेच डिसेंबरच्या पूर्वार्धात शंभर रूपयांना वीस बांगडे मिळत होते, परंतु आता तेच बांगडे 200 रुपये किलो दराने विकले जात आहेत. मध्यम आकाराचे बांगडे शंभर रुपयांना 6 ते 7 विकले जातात.

इतर मासळीच्या दरात देखील काही प्रमाणात वाढ झाली आहे. 500 रुपये किलोने मिळणारा इसवण आता 600 ते 700 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

राज्यात नववर्षाच्या काही दिवस अगोदर मासळी दरात वाढ झाली. त्यात काही प्रमाण चढउतार होत आहेत मात्र दर कायम असल्याने आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला ते परवडत नाही. गोमंतकीय हे मत्सप्रेमी असल्याने आठवड्यातून किमान दोनदा तर मासळी हवीच असते.

अशा परिस्थितीत वाढलेले दर पाहता ओल्या मासळी आवड खाऱ्या बांगड्यावर भागविण्याची स्थिती नागरिकांवर येऊ शकते. आज पणजी बाजारात इसवण, कोळंबी, पापलेट, माणकी, लेपो, खुबे आदी माशांना अधिक मागणी आहे.

पापलेट हजार रुपये, कोळंबी आकाराप्रमाणे 300 ते 500 रुपये, इसवण 600 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.

खाद्यसंस्कृतीचा आस्वाद

अनेक पर्यटक गोव्यात केवळ गोमंतकीय खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी येतात. गोव्यातील फिश फ्राय, प्रामुख्याने झसवण, कोळंबी, पापलेट फ्रायवर ताव मारणे, चिकन क्राफीयाल आदी पदार्थांचा मनमुरादपणे आनंद लुटण्यास अनेक खवय्यांना आवडते.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात मासळीला मागणी वाढल्याने दरात देखील वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT