Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : भारतीय जैन संघटनेचे पहिले राज्य अधिवेशन यशस्वी

Goa News : गोव्यातील श्रावक-श्राविका व कार्यकर्त्यांची उपस्थिती, डिरेक्टरीचे प्रकाशन

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

सासष्टी, भारतीय जैन संघटनेचे पहिले राज्य अधिवेशन मडगावात यशस्वीरित्या पार पडले. समाजातील शंभर टक्के समस्या सुटणार नाहीत.

पण त्यांची तीव्रता कमी होऊ शकते. कार्यकर्त्यांनी निःस्वार्थीपणे कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथ्या यांनी या अधिवेशनात केले.

या अधिवेशनाला संपुर्ण गोव्यातील सकल जैन समाजाचे श्रावक-श्राविका व कार्यकर्ते उपस्थित होते.

उदघाटन सोहळ्यास संस्थापक शांतीलाल मुथ्या, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि नवनिर्वाचीत राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांकला, बीजीएसच्या व्यवस्थापकीय संचालक कोमल जैन, बीपीएस क्लब मडगावचे अध्यक्ष योगीराज कामत उपस्थित होते.या प्रसंगी जैन कुटुंबीयांच्या कौटुंबिक डिरेक्टरीचे प्रकाशन करण्यात आले.

बीजेएस गोवा राज्य अध्यक्ष भरत पाटील, सचिव राजू देवरमनी व बीजेएसचे कार्यकारी सदस्य बाहुबली शेंदुरे आदी कार्यकर्त्यांनी हे अधिवेशन यशस्वी करण्यास बरेच परिश्रम घेतले. संपूर्ण अधिवेशनाचे सूत्रसंचालन स्वाती पाटील यांनी केले.

भरत पाटील यांची २०२५-२६ सालासाठी गोवा राज्य अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. सचिव राजू देवरानी यानी आभार मानले.

विविध विषयांवर सखोल चर्चा

या अधिवेशनात जैन समाजाच्या आणि देशातील वाढत्या ज्वलंत समस्या, मुलांमधील वाढता राग आणि तणाव, किशोर वयातील मुला मुलींच्या वाढत्या समस्या, सुखी वैवाहीक जीवन आणि योग्य जोडीदार या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT