Three Military Training Regiments Dainik Gomantak
गोवा

सैन्यात भरती होण्यासाठी अग्निवीरांची पहिली तुकडी तयार; 1422 जणांचा समावेश

नावेलीच्या 3 एमटीआर केंद्रावर दीक्षांत समारंभ संपन्न

दैनिक गोमन्तक

Three Military Training Regiments: भारतीय सैन्याना मदत मिळावी या उद्देशाने भारत सरकारने जी अग्निवीर योजना सुरू केली होती तिची पहिली तुकडी सैन्यात जायला तयार झाली असून ही देशातली पहिलीच अग्नीवीर तुकडी असेल.

यातील नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे मागचे वर्षभर या तुकडीला मडगाव जवळ नावेली येथील 3 एमटीआर केंद्रावर प्रशिक्षण चालू होते. असे जरी असले तरी या तुकडीत एकही गोमंतकीयाचा सामावेश नाही.

या योजनेखाली 1422 अग्निवीरांची देशातील पहिली तुकडी सैन्यात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. या अग्निवीरांचे प्रशिक्षण 31 जुलै रोजी पूर्ण झाले अूसन नावेलीतील ‘थ्री मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट’मध्ये आज त्यांचा दीक्षांत सोहळा पार पडला.

अग्निवीर योजना जाहीर झाल्यानंतर गोव्यात 1 जानेवारीला विविध भागांतून आलेल्या 1422 युवकांनी प्रशिक्षण ‘थ्री मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट’मध्ये प्रशिक्षण सुरू केले होते. 31 जुलै रोजी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले.

अग्निवीर योजनेंतर्गत युवकांना भारतीय लष्करामध्ये भरती होता येते. या भरतीमध्ये अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन, म्युनिशन एक्झामिनर), अग्निवीर क्लॉर्क/स्टोअर किपर, अग्निवीर ट्रेडसमन जनरल व अग्निवीर ट्रेडसमन टेक्निकल अशा पदांचा समावेश आहे.

इथे पहा व्हिडिओ :

या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या देशातील विविध भागातील युवकांच्या निवड चाचणीची सुरुवात नावेली येथील थ्री मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट परिसरात गेल्यावर्षी सुरू झालेली होती. अग्निवीरांची भारतीय सैन्यात एका वेगळ्या रँकवर नियुक्ती केली जाणार आहे.

जी विद्यमान रँकपेक्षा वेगळी असणार असून भरती झालेल्या युवकांपैकी 75 टक्के सैनिक चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होतील तर, 25 टक्के सैनिकांना कायमस्वरुपी जागांवर घेण्यात येणार आहे.

नावेली मिलिटरी कॅम्पमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी दीक्षांत परेड झाली. त्यानंतर चांगली कामगिरी केलेल्या सूर्यप्रकाश के, करणसिंह, दीप नारायण सिंग, राजकुमार, अभिषेक पुंडिर व गौरव निखिल भीमराव या प्रशिक्षणार्थींना गौरवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

''जोपर्यंत POK परत मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी...'', कारगिल भूमीवरुन राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल; सीमापार दहशतवादाचा कायमचा करणार बंदोबस्त

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! सावंतवाडी स्थानकावर तीन सुपरफास्ट गाड्यांना थांबा, 'असं' असेल वेळापत्रक

Raigad Fort History: रायगड जिल्ह्यातील इतिहासावर नवा प्रकाश

Shocking Viral Video: झोपलेल्या शेतकऱ्याच्या शर्टात घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क; थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT