Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : संशोधनाची जोड असलेल्या ‘कलावंत’ला प्रथम पुरस्कार; सातासमुद्रापार डंका

Panaji News : ‘छंदश्री’च्या स्पर्धेत सामाजिक विभागात लेखाला अव्वल स्थान

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी,गोमन्तक दिवाळी अंकावर पुरस्कारांचा वर्षाव होत असून यात आणखी एका प्रतिष्ठित पुरस्काराची भर पडली आहे.

‘छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धे’मध्ये गोमन्तक दिवाळी अंकातील संपादक-संचालक राजू नायक यांनी लिहिलेल्या ‘कलावंत’ या लेखाला ‘उत्कृष्ट सामाजिक लेख’ या विभागात प्रथम पुरस्कार मिळाला आहे. गोमन्तक दिवाळी अंकास यावर्षी मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे.

संशोधनाची जोड असलेला ‘कलावंत’ हा लेख खूप गाजला. दिवाळी अंक प्रसिद्ध होण्यापूर्वी या लेखाच्या केलेल्या जाहिरातीमुळे अनेकांना याविषयाची उत्सुकता निर्माण झाली होती. गोव्यातील कलावंत - कलवत समाज, जो नंतरच्या काळात ‘गोमंतक मराठा समाज’ म्हणून नावारूपाला आला. ज्याने बौद्धिक तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातही भरीव कामगिरी बजावली, अशा समाजाचा इतिहास ते वर्तमान असा आढावा घेणारा लेख यावर्षी खूप गाजला.

गोमन्तक दिवाळी अंक प्रसिद्ध होण्यापूर्वीच या लेखासाठी गोव्यातील आणि गोव्याबाहेरील वाचकांनी नोंदणी केली होती. ‘कलावंत’ लेखाची दखल आता ‘छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धे’ने घेतली आहे.

‘गोमन्तक’चा सन्मान!

छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धा महत्त्वाची मानली जाते. सिंगापूर, अमेरिका, लंडन सारख्या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून प्रसिद्ध होणारे दिवाळी अंकदेखील या स्पर्धेसाठी पाठवले जातात. त्यामुळे खऱ्या अर्थाने ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिवाळी अंक स्पर्धा ठरते. अशा स्पर्धेत गोमन्तक दिवाळी अंकातील लेखास प्रथम पुरस्कार मिळणे, हा मोठा सन्मान आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

BJP Mission 2027: भाजपचे 'मिशन 2027'; जल-जंगल-जमिनीपेक्षा 'मतव्यवस्थापन' ठरणार निर्णायक, उमेदवारांच्या निवडीवरही मोठी नजर

SCROLL FOR NEXT