fireworks  Dainik Gomanta
गोवा

अंत्रुज महालातही आतषबाजी!

फोंडा, शिरोडा, प्रियोळला मिळाला बहुमान; शुभेच्छांचा वर्षाव

दैनिक गोमन्तक

फोंडा: गोवा राज्य मंत्रिमंडळात फोंडा तालुक्यातील फोंडा, प्रियोळ आणि शिरोडा या तीन मतदारसंघांना स्थान मिळाल्‍याने फोंडावासीयांनी आनंद व्‍यक्त केला. विशेष म्हणजे फोंडा मतदारसंघाला तब्बल दहा वर्षांनंतर मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे.

फोंडा तालुक्यातील मडकई सोडल्यास अन्य तीन मतदारसंघांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. पुढील टप्प्यात कदाचित मगोला मंत्रिमंडळात स्थान दिले तर मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. साहजिकच फोंडा तालुक्याचा विकास करण्यात कोणतीच आडकाठी येणार नाही, अशी अपेक्षा अंत्रुजवासीय व्‍यक करीत आहेत.

प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे यांना दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे, ते त्यांच्या कार्यक्षमतेमुळे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. गावडे यांनी प्रियोळ मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला. त्याचबरोबर शिरोड्याचे आमदार तथा ज्येष्ठ राजकारणी सुभाष शिरोडकर यांनी मागच्या पोटनिवडणुकीत भाजपच्‍या तिकिटावर निवडून येण्याची किमया केली, तरी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. आता प्रतिकूल परिस्थितीतही त्‍यांनी आपले नेतृत्व सिद्ध केल्याने त्यांचे मंत्रिमंडळात स्थान निश्‍चित होते.

फोंडा मतदारसंघात प्रथमच कमळ फुलले असून आमदार रवी नाईक यांच्यामुळे ते शक्य झाल्याचे बोलले जात आहे. धोरणात्मक निर्णय आणि विकासाची जिद्द यामुळेच दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा फोंड्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. दरम्‍यान, चारही मतदारसंघांत फटाक्यांची आतषबाजी करण्‍यात आली.

राज्य मंत्रिमंडळात ज्येष्ठ आमदार रवी नाईक यांना स्थान मिळाले आहे. हा एकप्रकारे फोंडावासीयांचा सन्मानच आहे. रवी नाईक यांच्याकडून फोंड्याचा अधिकाधिक विकास होईल, हे निश्‍चित.

- विश्‍वनाथ दळवी,

फोंडा मतदारसंघासह प्रियोळ व शिरोड्याला मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपने योग्य व्यक्तींचा सन्मान केला आहे. रवी नाईक हे ज्येष्ठ राजकारणी आहेत. त्‍यामुळे तालुक्यात विकासगंगा येईल.

- सुदेश भिंगी,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT