पणजी: मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सरकारतर्फे अग्निशमन दलाच्या जवानांना सुरक्षा भत्ता लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा केली. 'राष्ट्रीय आपदा योजनेखाली' प्रशिक्षण देऊन विविध तालुक्यात 'आपदा मित्र' आणि 'आपदा सखीची' नियुक्ती करण्यात येईल अशीही घोषणा त्यांनी केली. (firefighters will get security allowance says Pramod Sawant)
अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयातर्फे राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ.सावंत बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी समाजासाठी प्रशंसनीय सेवा केल्याबद्दल अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे कौतुक केले लोकांना चांगली सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार आवश्यक असलेली सर्व उपकरणे आणि यंत्रसामग्री खरेदी करणार असे आश्वासनही त्यांनी दिले. मुख्यमंत्री डॉ. सावंत (Pramod Sawant) यांनी इतर राज्यांच्या अधिकाऱ्यांसाठी उच्च दर्जाचे सुरक्षा प्रशिक्षण उपलब्ध करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
विविध फायर फायटींग आणि अग्निशमन बचाव कार्याची विविध प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितीन रायकर यांनी नवीन तंत्रज्ञान, डेटा आणि इतर वापरण्याच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा खात्याचा मानस असल्याचे सांगितले. सुरक्षा जागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विविध उपक्रम राबविल्याची त्यांनी माहिती दिली. यावेळी फायर फायटींग आणि अग्निशमन बचाव क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल फायर फायटर, चालक, वॉचरूम ऑपरेटर्सना प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी अग्नीशमन संचालनालयाने शालेय मुलांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्याना बक्षिसेही प्रदान करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.