Mapusa Crime Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime: अग्निशमन दलाला आग विझवताना सापडला बालकाचा अर्धवट पुरलेला मृतदेह; मुंबईतील महिलेचा मुलगा...

म्हापशातील घटना; मृतदेहाचे शवविच्छेदन करणार

Akshay Nirmale

Mapusa Crime: गवताला आग लागली म्हणून अग्निशमन दल ती आग विझवायला आले पण दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवताना एका बालकाचा अर्धवट पुरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही माहिती समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हा मृतदेह एक ते दीड वर्षाच्या बालकाचा आहे. म्हापशातील मरोड येथे रजिस्ट्रार ऑफिसजवळ या बालकाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत होता. अग्निशमन दलाला येथील गवताला आग लागल्याबाबत माहिती मिळाली होती.

त्यामुळे दलाचे जवान ही आग विझविण्यासाठी आले. त्यांना हा मृतदेह आढळून आला.

उत्तर गोव्याचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी सांगितले की, एका महिलेने चार दिवसांपुर्वी तिच्या मुलाचे निधन झाल्याचे सांगितले आहे. बालक लहान असल्याने त्याला पुरण्याचा निर्णय घेण्यात आला. आईनेच या मुलाला येथे पुरले.

त्यांनी तिथे पुजा केल्याचेही दिसते. तिथे फुले आणि इतर साहित्य आढळून आले आहे. पण तपासाचा भाग म्हणून आम्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करणार आहोत आणि या प्रकरणाचा तपास केला जाईल.

दळवी म्हणाले की, मुलाला सर्दी आणि खोकला झाला होता, अशी माहिती संबंधित महिलेने दिली आहे. सध्या तरी या प्रकरणात काहीही संशयास्पद असल्याचे दिसत नाही. पण शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा केली पाहिजे. मृत बालकाची आई मुंबईची आहे.

गोव्यातील कार्निव्हलसाठी फुगे विकण्यासाठी ती आणि तिचे नातेवाईक गोव्यात आले होते. ते येथून जवळच सध्या राहत आहेत. उपजिल्हाधिकारी, मामलतदार, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षकांनी या घटनास्थळाची पाहणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

SCROLL FOR NEXT