Fire in Ponda Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात अग्नितांडव, घराला लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान

घरात कुणीही राहात नसल्याने जीवितहानी टळली, मात्र आगीत घराचं मोठं नुकसान

दैनिक गोमन्तक

फोंडा : दुर्गाभाट - फोंडा येथील एका घराला आग लागून लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नसरुदीन तारतुर यांच्या घराला लागलेल्या आगीत आतील लाकडी सामान जळाले. नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नसला तरीही आगीत 10 लाखांपेक्षा जास्त किमतीचे लाकडी सामान जळाल्याचा अंदाज आहे.

बुधवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान ही आग (Fire) लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घरात कुणीच राहत नसल्याने आगीचा अंदाज कुणाला आला नाही. मात्र तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीला घरात आगीच्या ज्वाळा दिसल्याने तब्बल दीड तासाने फोंडा अग्निशामक दलाला कळवण्यात आले. त्यानंतर फोंडा अग्निशमन दलाच्या दोन तर कुंडई येथील एक असे एकूण तीन बंब वापरण्यात आले. घरातील लाकडी सामान जळून घरालाही आगीची झळ बसली आहे. फोंडा अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) अधिकार्‍याने नुकसानीचा आकडा कळू शकला नसल्याचे सांगितलं असलं तरी हा आकडा लाखांच्या घरात जाणारा आहे.

दुसरीकडे मुरगाव सडा येथील विद्याधर रामा नागवेकर यांच्या घराला मंगळवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र आगीत कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मंगळवारी रात्री विजांच्या कडकडाटासह गोव्यात पाऊस (Rainfall) पडला. यामुळे संपूर्ण मुरगाव तालुक्यात विजेची समस्या निर्माण झाली होती. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता मुरगाव (Mormugao) सडा परिसरातील रहिवासी विद्याधर रामा नागवेकर यांच्या घरात वीजेमुळे शॉर्टसर्किट होऊन संपूर्ण घराला आग लागली.

यामुळे नागवेकर कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घराला आग लागताच आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी येऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. नंतर अग्निशमन दलाला पाचारण करुन आगीवर नियंत्रण मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT