Fire in Vegetable Shop in Sangem Dainik Gomantak
गोवा

सांगेत भाजीचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी

अज्ञाताने लावलेल्या आगीत भाजीच्या दुकानाचं लाखोंचं नुकसान

दैनिक गोमन्तक

सांगे : बोरचेमळ-सांगे येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या रेखा आनंद नाईक यांच्या फळ भाजी विक्री करणाऱ्या गाड्याला बुधवारी रात्री पावणेदहाच्या दरम्यान अज्ञात इसमाने आग लावली. या आगीत रोख आठ हजार रुपये व एक लाखांपेक्षा अधिक रुपयांचे सामान जळाले आहे. या घटनेची सांगे पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात रेखा नाईक यांनी तक्रार नोंदविली आहे. (Fire in Vegetable Shop in Sangem News Updates)

बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करून रेखा नाईक सांगे बाजारात गेल्या होत्या. यावेळी पाळत ठेवून असलेल्या एका अज्ञात इसमाने केरोसीनचा वापर करून आपल्या दुकानाला आग लावल्याचे रेखा नाईक यांनी सांगितले. अवघ्या पंधरा मिनिटाच्या फरकाने ही आग लागल्याचे उघडकीस आले. कारण बाजारातून परत दुकानात येईपर्यंत चारी बाजूने आग लागली होती. यावेळी शेजारी व रस्त्यावरून जाणाऱ्यांनी आग विझवण्यासाठी धडपड केली; पण आतील प्लास्टिक साहित्याने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला, असे रेखा नाईक म्हणाल्या. कुडचडे अग्निशामक दलाने (Fire Brigade) घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. सांगे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून केरोसिनचा वापर केलेल्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून रेखा नाईक यांनी गोवा (Goa) फलोत्पादन महामंडळाकडून भाजी विक्रीचा परवाना घेऊन दुकान सुरू केले होते. मोठ्या प्रमाणात गिऱ्हाईक नसले तरी पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून दुकान सुरु होते. त्यात शुक्रवारी असलेल्या जत्रेसाठी भाजी आणली होती. ती या आगीत (Fire) भस्मसात झाली आहे. या आगीत आतील सामान, प्लास्टिक साहित्य, गाड्याचे साहित्य जळून खाक झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT