Fire in Calangute Dainik Gomantak
गोवा

कळंगुटमध्ये अग्नितांडव, घरासह रेस्टॉरंट भस्मसात

सिलिंडरचा स्फोट झाल्याने दुर्घटना, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली

Santosh Govekar

कळंगुट : कळंगुट परिसरात पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळालं आहे. रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत शेजारील घरही जळून खाक झाल्याची घटना कळंगुटमध्ये घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली आहे. (Fire in Calangute News Updates)

खोब्रावाडा-कळंगुट (Calangute) येथे चार्लस्टन रोडवरील मीराबाई रेस्टॉरंटला गुरुवारी लागलेल्या आगीमुळे एका सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आग आणखी भडकली. या दुर्घटनेत रेस्टॉरंटशेजारील कृष्णा दीपक परूळेकर यांच्या घराला आग (Fire) लागल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पिळर्ण अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

या दुर्घटनेत दोन भरलेले सिलिंडर अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) कर्मचाऱ्यांनी सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. मात्र, घर आणि रेस्टॉरंटचे मोठं नुकसान झालं आहे. किती नुकसान झाले, याची माहिती मिळू शकली नाही, मात्र अग्निशनम दलाच्या जवानांमुळे मोठा अनर्थ टळला. भरवस्तीत आग लागल्याने परिसरात काहीकाळ भीतीचं वातावरण होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT