Fire in Vasco Dainik Gomantak
गोवा

Fire in Vasco : मुंडवेल वास्कोत अग्नितांडव; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान

आग लागली त्यावेळी फ्लॅटमध्ये कुणीच नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

गोमन्तक डिजिटल टीम

Fire in Vasco : मुंडवेल वाडे येथील सेंट अँड्र्यू रेसिडेन्सीमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागून लाखोंचं नुकसान झालं आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय घरमालकांनी व्यक्त केला आहे. आग लागल्याची माहिती वास्को अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणले. आग लागली त्यावेळी फ्लॅटमध्ये कुणीच नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

वास्को मुंडवेल वाडे येथील सेंट अँड्र्यू रेसिडेन्सीमधील नाईक यांच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट मधून धूर येत असल्याने एकच गोंधळ उडाला. याच इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दिली. आग लागली त्यावेळी फ्लॅटला कुलूप होते. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत फ्लॅटमध्ये प्रवेश करून आग आटोक्यात आणण्यात आली. फ्लॅटमध्ये आग लागल्याने संपूर्ण हॉल जळून खाक झाला, तर आगीमुळे फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

इमारतीत लागलेल्या आगीमुळे काहीकाळ परिसरात घबराट पसरली होती. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने जास्त हानी झाली नाही. वास्को वीज विभागाने इमारतीतील वीज बंद केली. या आगीत कुणालाही इजा झाली नसून मालमत्तेचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT