MLA Jeet Arolkar Dainik Gomantak
गोवा

मांद्रेतील माळरानाला लावली आग...!

स्थानिकांची तक्रार: कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची सूचना

दैनिक गोमन्तक

मोरजी: जुनसवाडा - मांद्रे येथील डोंगर माळरानावर आग लावून हजारो झाडांचे नुकसान केल्याची तक्रार स्थानिकांनी वन खाते आणि पोलिसांकडे केली आहे. आगीच्या या घटनेनंतर लगेच घटनास्थळी स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी भेट देऊन झाडांची पाहणी केली आणि संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची सूचना पोलिसांना केली आहे.

जुनसवाडा - मांद्रे येथील किमान साडेसात लाख चौरस मीटर सरकारची जागा आहे. त्यापैकी तीन हजार चौरस मीटर जागेत वीज उपविभागीय कार्यालय होणार आहे. या जागेत एकूण शंभर कोटी रुपये खर्च करून मांद्रे मतदारसंघासाठी खास वीज केंद्र उभारण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. या व्यतिरिक्त इतरही सरकारची जागा होती, त्या जागेत ‘देवरूख’ या निसर्गप्रेमी संस्थेने एकूण सत्तर हजारहून अधिक झाडे लावली होती.

आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून जी जागा सरकारने वीज उपविभागीय केंद्र उभारण्यासाठी दिली होती. त्या जागेची साफसफाई करण्यासाठी पणजी येथील एका खासगी कंपनीला कंत्राट दिले होते आणि त्या कंत्राटदाराच्या साईड इंजिनियरने या ठिकाणी सहा कामगारांना सांगून झाडे झुडपे छाटण्याचे काम सुरू केले होते. त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मजुरांनी परिसरातील वाळलेल्या कुरणाला आग लावली आणि हा हा म्हणता पूर्ण डोंगर जळून खाक झाला. त्यातील ‘देवरूख’ या संस्थेने लावलेली हजारो झाडे जळून खाक झाली.

...आणि ‘देवरूख’ कार्यकर्ते ढसाढसा रडले

या डोंगरावर ‘देवरूख’ या पर्यारणप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय कष्टाने सत्तर हजारहून अधिक झाडे लावली होती. ती या आगीत जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच ‘देवरूख’च्या कार्यकर्त्यांनी घटना येऊन पाहिली आणि त्यांना धक्काच बसला. आपण परिश्रमपूर्वक लावलेली झाडे बेचिराख झाल्याचे पाहून त्यांना दुःख अनावर होऊन ते ढसाढसा रडू लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT