Fire Brigade  Dainik Gomantak
गोवा

आता बुडणाऱ्यांचा बचाव करणार अग्निशमन दल!

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपदा सखी-मित्रांना प्रमाणपत्रांचे वाटप

दैनिक गोमन्तक

पणजी : बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी यापूर्वी भारतीय नौदल वा तटरक्षक दलाची मदत घेतली जात होती. मात्र, ही मदत आता अग्निशमन दलामार्फत करण्यात येणार आहे. केंद्र सरकारची आपदा मित्र व सखी योजनेखाली प्रशिक्षण पूर्ण करून आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी कार्य करणाऱ्यांना सरकारतर्फे किमान मानधन दिले जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व अग्निशमन सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आपदा सखी व मित्र योजनेखाली राज्यातील 37 जणांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुख्य सचिव डॉ. पुनीत कुमार गोएल, महसूल सचिव संदीप जॅकीस, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी कुणाल सत्यार्थी, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे तसेच अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपदा सखी व मित्र या योजनेच्या प्रशिक्षणाची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मदतीने अग्निशमन दलातर्फे 37 आपदा सखी व मित्र उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यात 22 आपदा मित्र तर 15 आपदा सखींचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार सुमारे 400 आपदा मित्र - सखींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आतापर्यंत या योजनेखाली सुमारे 350 जणांनी नोंदणी केली आहे. उर्वरित उमेदवारांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाईल. या आपदा मित्र व सखींना आपत्कालीन काळात भूकंप, पूर, बचाव कार्य, वादळ तसेच प्रथमोपचार असे विविध प्रशिक्षण देण्यात आले असून ते कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास सक्षम आहेत. ही केंद्र सरकारची योजना असल्याने प्रशिक्षणासाठी त्यांच्याकडूनच अनुदान देण्यात आले आहे.

राज्य सरकार भविष्यात आपत्कालीन प्रसंगांना तोंड देण्यास तत्पर आहे. आपत्तीविषयी माहिती देणारी केंद्रे प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आली आहेत. आपदा सखी मित्रांची स्वेच्छा सेवा पोलिस चौकी किंवा अग्निशमन केंद्रावर त्यांची नियुक्ती केली जाईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासाठी विविध प्रमाणपत्र अभ्यास सुरू करण्यात येणार असून त्यासाठी नोकरभरती प्रक्रिया नियमांतही सुधारणा करावी लागणार आहे. असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT