Fire |usgao  Dainik Gomantak
गोवा

Fire News: उसगावात स्टील इंडस्ट्रीजला भीषण आग

गावकरवाडा-उसगाव येथील फॅन्सी स्टील इंडस्ट्रीजला शनिवार, 4 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आग लागून 25 लाखांचे नुकसान झाले.

दैनिक गोमन्तक

Fire News: गावकरवाडा-उसगाव येथील फॅन्सी स्टील इंडस्ट्रीजला शनिवार, 4 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आग लागून 25 लाखांचे नुकसान झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे चार बंब लागले.

उसगावात गावकरवाडा ते कल्लभवाडा या भागात शुक्रवारी वीजवाहिन्या दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित केला होता. रात्री उशिरा या भागातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास फॅन्सी स्टील इंडस्ट्रीजच्या वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य स्वीच बोर्डकडे मोठा आवाज आला आणि लगेच या फॅक्टरीत धूर पसरला.

त्यामुळे फॅक्टरीतील कामगारांना जाग आली. त्यांनी पाहिले तेव्हा फॅक्टरीत आग लागली होती. त्यांनी आपल्या परीने आग शमविण्याचा प्रयत्न केला. इंडस्ट्रीजचे मालक मुकेश मालवीय यांना या दुर्घटनेची माहिती दिली.

नंतर 4.30 वाजता फोंडा अग्निशमन दलाला याची माहिती दिली. फोंडा येथून दोन आणि कुंडई अग्निशमन दलाचा एक बंब उसगावात दाखल झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांनी बरेच परिश्रम घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aitar Worship Traditional: 'आयतार पूजन' गोवा-कोकणची लोकपरंपरा आणि निसर्गाचं अतूट नातं!

Iran Oman New Route: ट्रम्प यांचा दावा ठरला फुसका फटाका! इराणनं ओमानसोबत हातमिळवणी करत रचला नवा 'गेम प्लॅन'; अमेरिकन जहाजे होणार जप्त?

Porvorim Gun Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण; पोलिसांना चकवा देणारे 'ते' नेमके आहेत तरी कुठे? गोवा पोलिसांची 'स्पेशल टीम' उत्तर-पश्चिम भारतात रवाना

Best Wedding Destination: निसर्गरम्य किनारे अन् रोमँटिक वातावरणाची जादू... गोव्याला 'सर्वोत्तम विवाह स्थळ' पुरस्कार, दिल्लीतील प्रदर्शनात सन्मान

Goa Mercedes Crash: आधी वडिलांना शिवीगाळ करत मारहाण, नंतर जीवघेणा अपघात; चालक विद्याधर प्रभूचा मर्सिडीज 'कार'नामा

SCROLL FOR NEXT