Goa Fire News File Photo
गोवा

Goa Fire News: रवींद्र भवनामागील जुन्या बंद घराला आग; कारण अस्पष्ट

या बंद घराला आग नेमकी कशामुळे लागली याचे खरे कारण अद्याप कळू शकले नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Fire News: काल (बुधवारी) दुपारी रवींद्र भवनामागील एका जुन्या बंद घराला आग लागल्याची घटना घडली. यानंतर मडगाव अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम केले.

तिथेच राहणाऱ्या रामनर्थ बढे यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून कामाला सुरुवात केली. यामध्ये फक्त बंद घराला आग लागल्याचे समजले.

मडगाव नगरपालिकेचे वॉर्ड नगरसेवक व्हिटोरिनो टावरेस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, रहिवासी हे गैरकृत्यांचे काम आहे की नाही हे सांगू शकत नाही, परंतु राज्यभरात वाढत्या आगीच्या घटना पाहता सरकारी यंत्रणांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

एका अग्निशमन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ती आग जुन्या घराला लागली असून आतमध्ये काही लाकडांचा साठा होता. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली.

या बंद घराला आग नेमकी कशामुळे लागली याचे खरे कारण अद्याप कळू शकले नाही.

दरम्यान, महिन्याच्या सुरवातीला म्हादई अभयारण्यात लागलेल्या आगीचे पंचनामे सुरू आहेत. अशातच आज पुन्हा अभयारण्याच्या सुर्ला भागात आग लागल्याचे निदर्शनास आले. स्थानिकांनी ही बाब वन खात्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर स्थानिकांच्या सहकार्याने खात्याने आग नियंत्रणात आणली.

पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर म्हणाले, काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगींमुळे म्हादई अभयारण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा येथील जैवविविधतेला मोठा फटका बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT