Arvind Kejriwal  Dainik Gomantak
गोवा

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करणे पडले केजरीवाल यांना महागात

प्रचारबंदी काळात उमेदवार किंवा राजकीय पक्षांना सक्रिय प्रचाराला परवानगी नसते.

दैनिक गोमन्तक

पणजी: प्रचारबंदी काळात व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. केजरीवाल यांनी कुडचडे मतदारसंघातील आपचे उमेदवार गॅब्रिएल फर्नांडिस यांचा प्रचार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रचारबंदी काळात उमेदवार किंवा राजकीय पक्षांना सक्रिय प्रचाराला परवानगी नसते. याकाळातच 13 फेब्रुवारी रोजी केजरीवाल यांनी व्हिडिओ (Video) शेअर केला. यासंबंधी 15 फेब्रुवारीच्या रात्री कुडचडे मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी नीलेश धायगोडकर यांनी तक्रार दाखल केली होती, अशी माहिती पोलिसांनी (Police) दिली.

पोलिसांनी सांगितले की, केजरीवाल यांनी 13 फेब्रुवारी रोजी 'आप' गोव्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ते कुडचडे मतदारसंघातील आपचे उमेदवार गॅब्रिएल फर्नांडिस यांचा प्रचार करत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT