FDA  Dainik Gomantak
गोवा

अदानी विल्मर, राजपुरोहित आणि सन्मान स्विटमार्ट यांना गोवा FDA कडून 1.35 लाखांचा दंड, जाणून घ्या प्रकरण

अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या चाचणीत पदार्थ निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे.

Pramod Yadav

निकृष्ट दर्जाचे पदार्थ आणि खाद्यवस्तूंची निर्मिती आणि विक्री केल्याप्रकरणी गोवा अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) वतीने नागपूर येथील अदानी विल्मर, सासष्टी येथील राजपुरोहित आणि वास्को, मुरगाव येथील सन्मान स्विटमार्ट या तीन दुकानांना 1.35 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

अदानी विल्मर लि. कंपनीने निर्मिती आणि विक्री केलेले फॉर्च्युन प्लस सोया हेल्थ रिफाईंनड सोयाबिन तेल निकृष्ट असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. या तेलात विटामिन अ आणि विटामिन ड यांचे प्रमाण निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा कमी आढळून आले.

त्यामुळे प्राप्त तक्रारीनुसार, FDA कडून सावनेर, नागपूर महाराष्ट्र येथील अदानी विलमर कपंनीला एक लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.

तसेच. सासष्टी येथील राजपुरोहित स्वीट मार्टला 5,000 रूपयांचा दंड ठोठावला आहे. स्वीटमार्टच्या वतीने पापडी, खारेगाठी, भावनगरी शेव यांचे उत्पादन निकृष्ट दर्जाचे असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले. या पदार्थांमध्ये फॅटचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले.

तिसरे प्रकरण वास्को मुरगाव येथील असून, यात सन्मान स्वीट मार्टला तीस हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्वीट मार्टच्या वतीने निकृष्ट दर्जाच्या गाठींची निर्मिती आणि विक्री केली असून, त्यात फॅटचे प्रमाण अधिक आढळून आले आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी अंकिता पालयेकर यांनी तिन्ही तक्रारी दाखल केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

Rohit Sharma: 'मला घरी बोलावलं, अर्धा तास माझ्यासोबत...' रोहित शर्माबाबत स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; सांगितली संपूर्ण कहाणी

GST Collection: गोव्यात पाच महिन्यांत 1,143 कोटींचा जीएसटी जमा; 20,960 सक्रिय करदाते, कॅसिनोंबाबतही मोठी स्पष्टता

Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT