Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: साक्षीदारांना शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्‍हान

Goa Police: वीज घोटाळा : पाठविलेले समन्‍स पुन्‍हा आले परत

दैनिक गोमन्तक

Goa Police: 25 वर्षांपूर्वी घडलेल्‍या आणि अजूनही न्‍यायालयात साक्षी-पुराव्‍यांच्‍या स्‍तरावरच रेंगाळलेल्‍या तत्‍कालीन वीजमंत्री माविन गुदिन्‍हो यांच्‍या विराेधातील 5.45 कोटींच्‍या कथित वीज बिल सवलत घोटाळा प्रकरणात जुन्‍या साक्षीदारांना शोधून काढून त्‍यांना साक्षीसाठी न्‍यायालयात हजर करणे हे पोलिसांसाठी एक मोठे आव्‍हान ठरले आहे.

Goa Politics: आलेक्स सिक्वेरांना अपात्र ठरवा !साक्षीदारांचे पत्ते सापडत नसल्‍याने त्‍यांना पाठविलेले समन्‍स परत येऊ लागले आहेत. आजही साक्षीदारांचे पत्ते न सापडल्‍याने 8 समन्‍स परत आले.

या प्रकरणाची सुनावणी खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर सुरू आहे. काँग्रेस सरकारातील तत्‍कालीन वीजमंत्री आणि भाजप सरकारमधील विद्यमान पंचायत तथा वाहतूक मंत्री माविन गुदिन्‍हो यांच्‍यासह वीज खात्‍याचे तत्‍कालीन मुख्‍य अभियंते टी. नागराजन, कृष्‍णकुमार, आर. के. राधाकृष्‍णन आणि मे. मुरगाव स्‍टील लिमिटेड, मे. बिनानी झिंक या दोन कंपन्‍यांचे प्रतिनिधी या प्रकरणात आरोपी आहेत.

1998 सालचे हे प्रकरण असून उच्‍च दाबाची वीज वापरणाऱ्या कंपन्‍यांना वीज बिलात 25 टक्‍के सवलत देण्‍याची मागे घेतलेली अधिसूचना मंत्रिमंडळाची मंजुरी न घेता पुन्‍हा नव्‍याने जारी करून काही बड्या कंपन्‍यांना बेकायदेशीररित्‍या त्‍याचा फायदा मिळवून दिला, असा गुदिन्‍हो आणि अन्‍य संशयितांवर आराेप ठेवला आहे.

चारजणांचे पत्ते शोधून नव्‍याने समन्‍स

आज या खटल्‍याची सुनावणी असता, 8 साक्षीदारांचे पत्ते न सापडल्‍याने समन्‍स परत आले आहेत, ही माहिती न्यायाधीशांना दिल्‍यानंतर ही सुनावणी 24 तारखेपर्यंत तहकूब करण्‍यात आली. लेखा खात्‍यातून या साक्षीदारांचे पत्ते शाेधून काढा, असे यावेळी अभियोग पक्षाला सांगण्‍यात आले. आज जे आठ समन्‍स परत आले, त्‍यातील चार साक्षीदारांचे नवे पत्ते लेखा संचालनालयाकडून मिळविण्‍यात पोलिसांना यश आल्‍याने या चारजणांना नव्‍याने समन्‍स बजावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT