Find out the big reduction in petrol-diesel prices Fuel prices in Goa  Dainik Gomantak
गोवा

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात जाणून घ्या गोव्यातील इंधनाचे दर

आज, रविवारसाठी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. बदललेल्या दरानंतर रविवारी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल शनिवार, 21 मे रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेल 6 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली. करात कपात केल्यानंतर पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले.

(Find out the big reduction in petrol-diesel prices Fuel prices in Goa)

वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना सरकारच्या या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आज, रविवारसाठी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. गोव्यात पेट्रोल 97.90 तर डिझेल 90.44 दराने विकले जात आहे

Goa Petrol Price Today

  • North Goa ₹ 97.90

  • Panjim ₹ 97.90

  • South Goa ₹ 97.75

Goa Diesel Price Today

  • North Goa ₹ 90.44

  • Panjim ₹ 90.44

  • South Goa ₹ 90.29

बदललेल्या दरानंतर रविवारी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. यापूर्वी सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी मार्च-एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10.20 रुपयांपर्यंत वाढ केली होती. आता नव्या दरानुसार दराने फेब्रुवारीपासून एकदाची पातळी गाठली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $110 च्या वर आहेत. आज, रविवारी ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $112 च्या वर व्यवहार करत आहे.

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जारी केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT