FTII Film Making Course Dainik Gomantak
गोवा

FTII Film Making Course: गोमंतकीयांनो! चित्रपटांच्या दुनियेत करियर घडवायचं आहे का? FTII पणजीत देणार 'फिल्म मेकिंगचे' धडे

FTII Film Making Course Goa: फिल्म मेकिंग कोर्समध्ये आता कमी अनुभव असलेल्या किंवा कोणताही अनुभव नसलेल्या व्यक्तींना चित्रपट निर्मितीचे धडे दिले जातील

Akshata Chhatre

Film and Television Institute of India

पणजी: तुम्हाला चित्रपट निर्मितीची आवड असल्यास गोव्यातून तुमच्यासाठी एक खास बातमी समोर आलीये. तुम्हाला गोव्यातल्या गोव्यात फिल्म मेकिंग शिकायचं असेल किंवा खास गोव्यात येऊन फिल्म मेकिंग शिकायचं असेल तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन आलंय. या अनोख्या फिल्म मेकिंग कोर्समध्ये आता कमी अनुभव असलेल्या किंवा कोणताही अनुभव नसलेल्या व्यक्तींना चित्रपट निर्मितीचे धडे दिले जातील.

हा कोर्स पटकथालेखन, अभिनय आणि चित्रपट दिग्दर्शन यासह चित्रपट निर्मितीच्या प्रमुख पैलूंची मूलभूत समज देण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

फिल्म मेकिंगची आवड असल्यास या कोर्समुळे तुमचा पाया पक्का होईल. चला मग या फाउंडेशन कोर्सबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून सुरु करण्यात आलेला हा कोर्स २७ जानेवारी ती १६ फेब्रुवारीपर्यंत द आर्टहाऊस अकादमी सांगोल्डा येथे चालेल. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत इच्छुकांना फिल्म मेकिंगचे धडे दिले जातील, ज्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर केला जाईल आणि या कोर्समध्ये १ ते २ असा तासाभराचा मोकळा वेळ दिला जाणार आहे.

या कोर्समध्ये भाग घेण्यासाठी तुमचं किमान १० ते १२ पर्यंत शिक्षण पूर्ण होणं गरजेचं आहे. जस्मिन कौर रॉय या कोर्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. या कोर्सचा भाग बनण्यासाठी तुमचं वय १ जानेवारी २०२५ पर्यंत १८ किंवात्याहून अधिक असणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या कोर्सची फी ३८ हजार रुपये आहे.

तुम्हाला फिल्म मेकिंगची आवड असल्यास १३ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तुम्ही नावनोंदणी करू शकता. या कोर्समध्ये एकूण १८ जागा उपलब्ध आहेत आणि पैकी १५ जागा भरल्या तरच हा कोर्स घेला जाईल, काही कारणास्तव जर का कोर्स होऊ शकला नाही तर तुम्हाला पैसे परत केले जातील. कोर्सच्या शेवटी तुम्हाला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून प्रमाणपत्र दिलं जाईल मात्र यासाठी ९० टक्के उपस्थिती गरजेची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT