Shirgao mining pits Dainik Gomantak
गोवा

Shirgao Mining: 50 वर्षे जुन्या खाणखंदकापासून गावाला वाचवा, शिरगाववासीयांची मागणी; पावसात 'ओव्हरफ्लो' होण्याची भीती व्यक्त

Shirgao mining pits: राज्यातील विविध खाणींवरील १८ खनिज डंपचे ई-ऑक्शन करण्याचे खाण आणि भूगर्भ खात्याने निश्चित केले आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून ही प्रक्रिया रखडली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: शिरगाव येथील खनिज डंप टाकून गावाला टेकून असलेले असुरक्षित आणि धोकादायक खाणखंदक बुजवावेत, अशी मागणी शिरगावच्या लोकांकडून करण्यात येत आहे.

राज्यातील विविध खाणींवरील १८ खनिज डंपचे ई-ऑक्शन करण्याचे खाण आणि भूगर्भ खात्याने निश्चित केले आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून ही प्रक्रिया रखडली आहे. गेल्या २२ जानेवारीपासून या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे निश्चित करण्यात आले होते. १८० पैकी १२५ बोलिदारांनी तांत्रिकदृष्ट्या बोलीही सादर केली आहे.

खाण खात्याच्या या निर्णयानुसार शिरगाव येथील खनिज डंप हटविण्यात येणार असल्यास हाच डंप टाकून खाणखंदक बुजवावेत आणि शिरगावच्या जनतेची संभाव्य संकटातून मुक्तता करावी, अशी मागणी शिरगावचे माजी सरपंच बाबुसो गावकर आणि दीनानाथ गावकर यांनी चार महिन्यांपूर्वी केली होती. शिरगाव गावाला टेकून असलेल्या खाणखंदकाजवळच बांदेकर आणि पूर्वाश्रमीच्या चौगुले कंपनीचा प्रचंड डंप साठा पडून आहे. सध्या चौगुलेची खाण साळगावकर शिपिंग कंपनीने घेतली आहे.

गावाच्या हिताचा विचार करावा!

शिरगाव गावातील प्रसिद्ध श्री लईराई देवीच्या मंदिरापासून साधारण ४०० ते ५०० मीटर अंतरावर चौगुले कंपनीचे खाणखंदक आहे. या खाणखंदकाला जवळपास ५० वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, आतापर्यंत या खाणखंदकापासून गावाला सुरक्षा मिळण्याच्यादृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही, की या खाणखंदकातील जलसाठ्याचे गावाच्या हितासाठी नियोजन करण्यात आलेले नाही.

गावाला टेकून कोमुनिदाद जागेत असलेले हे खाणखंदक दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. पावसाळ्यात तर खाणखंदकातील पाण्याबरोबर खाणीवरील गाळमिश्रित माती जवळपासच्या शेतीत घुसत आहे. जोरदार पर्जन्यवृष्टी झाली, तर हे खाणखंदक ‘ओव्हरफ्लो’ होते. हे खाणखंदक बुजविण्याच्यादृष्टीने वेळीच उपाययोजना केली नाही, तर भविष्यात गावावर मोठी आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती दीनानाथ गावकर, बाबुसो गावकर आणि अन्य नागरिकांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT