Mango
Mango Dainik Gomantak
गोवा

Goa Mango festival 2023 : पाचवे ‘आंब्यांचे फेस्त’ उद्या पणजीत

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्यातील वातावरण हे आंबा उत्पादनासाठी योग्य आहे. गोव्यात विविधांगी 75 प्रकारच्या आंब्यांचे उत्पन्न घेतले जायचे परंतु आता केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आंब्याचे प्रकार राहिले आहेत. त्यामुळे आंबा उत्पादन घेण्यास लोकांना प्रवृत्त करण्यासाठी 29 आणि 30 एप्रिल रोजी काकुलो मॉल पणजी येथे आंब्याचे फेस्त आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती गोंयचो फेस्तकार मारियास फर्नांडिस यांनी दिली.

ते ‘फुडी गोवन्स’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रकाश कामत, मारियास फर्नांडिस, रोशन गोन्साल्विस व इतर उपस्थित होते. राज्यात सध्या फळांचा हंगाम सुरू असून काजू, आंबे, फणस, करवंद आदी विविध प्रकारच्या फळांना बहर आलेला आहे.

परंतु गोव्यातील आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. गोवेकरांना आंबा व त्यापासून बनविलेली विविध प्रकारची लोणची, गोड पदार्थ आदी एकत्र विकत घेता येईल. आपल्याकडे आंब्याची लागवड करण्याची एक विशिष्ट पद्धत होती त्यामुळे ही झाडे कित्येक वर्षे टिकून राहायची मोठ्या प्रमाणात हजारो आंबे एकाच झाडाला असायचे.

परंतु ही लागवडीची पद्धत आम्ही विसरत चाललो आहोत. ‘आंब्याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील आव्हाने’ याबाबत कार्यक्रमात चर्चा करण्यात येणार असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.

दिव्यांगांचा सहभाग

हे फेस्त सर्वसमावेशक फेस्त आहे त्यासोबतच या फेस्तादरम्यान कोणत्याच प्रकारची नासाडी केली जाणार नाही हे फेस्त झीरो वेस्ट असेल. या फेस्तात अनेक दिव्यांग नागरिक सहभागी होणार आहे. हिमोफेलियाशी झुंझणाऱ्या महिला यात सहभाग घेणार आहे. दिव्यांगांसाठी आवश्‍यक त्या सर्व सुविधा कार्यक्रम स्थळी उपलब्ध असल्याचे प्रकाश कामत यांनी सांगितले.

पुरूमेंताचे फेस्त

पावसाळ्यात लागणारे साहित्य, खाद्यपदार्थांची खरेदी व्हायची. त्यास्तव पुरूमेंताचे बाजार भरायचे, या संकल्पनेवर पुरमेंताचे फेस्त १९ ते २१ मेपर्यंत काकुलो मॉल, पणजी येथे आयोजित केले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

SCROLL FOR NEXT