Tourist Attacked in Anjuna Daink Gomantak
गोवा

Tourist Attacked in Anjuna: दिल्ली पर्यटक हल्ला प्रकरण! पाचवा आरोपी अटक, गाडीवरून निघाला होता ऑफिसला एवढ्यात...

पीडितांनी घटनेचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी सहा दिवसांनी कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.

Pramod Yadav

Delhi Tourist Attacked in Anjuna: दिल्लीतील पर्यटक कुटुंबीयांवर हणजूण येथील एका रिसॉर्टच्या बाहेर चार स्थानिक युवकांनी सुरीने प्राणघातक हल्ला केला. यात तिघेजण गंभीर जखमी होऊनही हणजूण (Anjuna) पोलिसांनी किरकोळ हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

पीडितांनी घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) केल्यानंतर पोलिसांनी सहा दिवसांनी कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. या प्रकरणातील पाचवा फरार आरोपीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणातील आरोपी सलीम कासिम खान (वय 41, रा, खोर्ली, म्हापसा) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दुचाकीवरून त्याच्या ऑफिसला निघाला होता. पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी स्वत: त्याला अटक केले.

यापूर्वी रॉयस्टन रेजिनाल्डो डायस, त्याचा भाऊ नायरॉन रेजिनाल्डो डायस (दोघेही रा. डिमेलो वाडा, हणजुण), जोसेफ अलेक्स लोबा (वय 57) आणि काशिनाथ विश्‍वोर आगरवाडेकर (दोघेही रा. सोरांतो वाडा, हणजुण) अशी अटकेत असलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. चौथा संशयित सलीम कासीम फरारी आहे.

हणजूण येथे पर्यटक कुटुंबीयावरील प्राणघातक हल्ला आणि पोलिसांचा निष्काळजीपणा यावरून राज्याची देशभरात बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी याप्रकरणी आढावा बैठक घेतली.

चुकीचा गुन्हा नोंद केलेल्या हणजूणचे पोलिस उपनिरीक्षक फ्रान्‍सिस्को झेविअर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात झाली. ‘पर्यटकांसाठी गोवा सुरक्षित असून त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; तसेच पर्यटकांनीही कायदे पाळावेत’, अशी इशारावजा सूचना त्‍यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT