Good Friday 2023 Dainik Gomantak
गोवा

Good Friday 2023: चुकूनही कुणाला 'हॅपी गुड फ्रायडे' म्हणू नका, जाणून घ्या कारण

Good Friday 2023: आज जगभरात गुड फ्रायडे साजरा केला जात आहे. ख्रिश्चन धर्मीय लोकांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे.

Manish Jadhav

Good Friday 2023: आज जगभरात गुड फ्रायडे साजरा केला जात आहे. ख्रिश्चन धर्मीय लोकांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे.

गुड फ्रायडे हा प्रभु येशूचा बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो. आजचाचं दिवस होता, जेव्हा प्रभु येशूला वधस्तंभावर लटकवले होते, म्हणून या दिवसाला 'ब्लॅक फ्रायडे' असेही म्हणतात.

गुड फ्रायडेच्या दिवशी, लोक प्रभु येशूच्या बलिदानाचे स्मरण करुन शोक करतात. या दिवशी, ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक चर्चमध्ये जातात आणि विशेष प्रार्थना करतात.

गुड फ्रायडेच्या शुभेच्छा कोणालाही सांगू नका

गुड फ्रायडे हा ख्रिश्चनांचा सर्वात मोठा सण नक्कीच आहे, परंतु या दिवशी चर्च किंवा घरांमध्ये उत्सवाचे वातावरण नसते. या दिवशी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर लटकवले गेले तेव्हा त्यांना खूप त्रास सहन करावा लागला.

प्रभू येशू ख्रिस्ताने गुड फ्रायडेलाच आपला प्राण सोडला होता. अशा परिस्थितीत, आजचा दिवस ख्रिश्चनांसाठी शोकाचा दिवस आहे, जेव्हा त्यांना त्यांच्या प्रभूचे दुःख आणि बलिदान आठवते.

हेच कारण आहे की, आजच्या दिवशी हॅपी गुड फ्रायडे म्हणणे योग्य नाही, कारण आपण आनंदात शुभेच्छांचा संदेश पाठवतो. परंतु तुम्ही आज येशू ख्रिस्ताने दिलेले संदेश आणि विचार पाठवू शकता.

प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर का लवटकवले?

ख्रिश्चन (Christian) धर्मीय मान्यतेनुसार, प्रभु येशू ख्रिस्त अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी लोकांना जागरुक करत होते. त्याचवेळी ते जगात प्रेम, ज्ञान आणि अहिंसेचा संदेश देत होते.

त्याचवेळी ज्यूंच्या कट्टरवादी धर्मगुरुंनी येशूला कडाडून विरोध केला. धर्मांधांनी त्यावेळचा रोमन गव्हर्नर पिलातुस याला येशूची माहिती दिली. रोमनांना नेहमी ज्यू क्रांतीची भीती वाटत होती.

अशा परिस्थितीत कट्टरवाद्यांना शांत करण्यासाठी पिलातुसने येशूला वधस्तंभावर लटकवून ठार मारण्याचा आदेश दिला.

प्रभू येशूने शेवटी सांगितले की, 'हे देवा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत हे त्यांना माहीत नाही'. दुसरीकडे, असे म्हटले जाते की, ज्या दिवशी प्रभु येशूला लाकडापासून बनवलेल्या वधस्तंभावर लटकवण्यात आले तो दिवस शुक्रवार होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

Pilgao Farmers Protest: शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तोडगा काढा! डिचोलीतील ट्रकमालकांची मागणी; आंदोलनाची दिशा ठरणार?

Cash For Job: आणखी एक ठकसेन! विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांना लुबाडले

Goa Cabinet: मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच? मुख्यमंत्री सावंत म्हणाले की पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसारच....

Rashi Bhavishya 24 November 2024: केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस,कामाच्या ठिकाणी स्थिती उत्तम असेल; जाणून घ्या आजचे भविष्य

SCROLL FOR NEXT