Female Tourist Fight on Vagator Beach Dainik Gomantak
गोवा

Vagator Beach: वागातोर बीचवर परदेशी महिला पर्यटकांमध्ये तूफान हाणामारी! व्हिडिओ व्हायरल

Female Tourist Fight on Vagator Beach: दोघींमध्ये भांडण होण्याचे नेमके कारण काय, हे कळू शकले नाही

Kavya Powar

Female Tourist Fight on Vagator Beach: वागातोर बीचवर दोन परदेशी महिला पर्यटक हाणामारी करत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तूफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दोघीही एकमेकींना मारत, केस ओढत असल्याचे दिसत आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या कॉमेंट्स करत आहेत.

काहींनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गोव्यासारख्या निसर्ग समृद्ध राज्यात, जिथे पर्यटक मनाला शांती देण्यासाठी येतात, तिथे अशा घटना होणे खरंच लज्जास्पद असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

पर्यटक महिला भररस्त्यात मारामारी करताना दिसत आहेत. या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पर्यटक इथे येऊन मनाला येईल तसे वागतात, इथले नियम पाळत नाहीत किंवा पोलिसांनाही घाबरत नाहीत, ज्यामुळे गोव्याची प्रतिमा खराब होते, असे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या महिला भांडत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्यांना कुणी रोखायला आले नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

त्या दोघींमध्ये भांडण होण्याचे नेमके कारण काय, हे कळू शकले नाही. माहितीनुसार, भांडणानंतर त्यांनी आपापसातच वाद मिटवला असून याबाबत पोलिसात तक्रात करण्यात आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT