Fogging, distribution of medicines by Dicholi Health Center Dainik Gomantak
गोवा

Goa: पूरग्रस्त साळ गावात रोगराईचा धोका

पूरग्रस्त साळ (Sal) गावात निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे डासांची (mosquitoes) पैदास वाढली असून, आता रोगराई (Disease) फैलावण्याचा धोका आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली - पूरग्रस्त साळ (Sal) गावात निर्माण झालेल्या अस्वच्छतेमुळे डासांची (mosquitoes) पैदास वाढली असून, आता रोगराई (Disease) फैलावण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने आता साळ गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. डिचोली (Bicholim) सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे (Health Centre) सोमवारी साळ गावात फॉगिंग आणि जंतूनाशक औषध फवारणी करण्यात आली. (Fear of spreading disease in flooded village)

आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी 'ओआरएस' पाकिटे आणि गोळ्यांचे वाटप केले. सामाजिक आरोग्य केंद्राची आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही उपाययोजना राबविण्यात आली. या आरोग्य केंद्राच्या सिस्टर प्रतिमा, शिवाजी तसेच रामा, सज्जन आदी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहकार्य केले.

यावेळी स्थानिक सरपंच घनश्याम राऊत आणि अन्य पंच उपस्थित होते. पुरामुळे पुढील काही दिवसात विशेष करून लहान मुलांमध्ये ताप, संडास यासारखे आजार फैलावण्याची शक्यता आहे. मलेरिया, डेंग्यूचाही फैलाव होण्याची भिती आहे. तेव्हा साळमधील जनतेने काळजी घ्यावी. ताप आदी आजाराची लक्षणे आढळून आल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधून सहकार्य करावे. असे आवाहन डॉ. मेधा साळकर यांनी साळवासियांना केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हडफडे दुर्घटना; समिती नेमली, पाहणीही झाली! पण कारवाई होणार का? 'लईराई जत्रोत्सवा'च्या दुर्घटनेचा अहवाल आजही धूळ खात - संपादकीय

Goa Nightclub Fire: 'हा अपघात नव्हे, 25 जणांचा खून! हडफडे नाईटक्लब दुर्घटनेवरून आमदार लोबो संतापले; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा 'चॅप्टर' कोणी 'क्लोज' केला?

नाताळची लगबग सुरू! सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या, दर 10 टक्क्यांनी वाढले

हडफडे क्लब आगीतील 3 मृतदेहांवर झारखंडमध्ये अंत्यसंस्कार; सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत

SCROLL FOR NEXT