Dengue Fear Dainik Gomantak
गोवा

मडगावात डेंग्यूची भीती

डासांचा वाढला उपद्रव: आरोग्य कर्मचारी सक्रिय

दैनिक गोमन्तक

सासष्टी: अवकाळी पावसामुळे शहरात पुष्कळ ठिकाणी पाणी साचले होते. तसेच पावसाळा जवळ आला तरी नगरपालिकेला अजून मॉन्सूनपूर्व कामे करता आलेली नाहीत. त्यामुळे डासांची उत्पत्ती शहरात वाढू लागली असून रहिवाशांना डेंग्यूच्या प्रादुर्भावाची भीती सतावत आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य खात्याचे कर्मचारी कार्यरत झाले असून त्यांनी अनेक उपाययोजना राबवणे सुरू केले आहे.

मडगाव शहरात मलेरियाचे रुग्ण जास्त आढळून येत नाहीत, पण डेंग्यूचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे या रोगाचा फैलाव वाढू नये म्हणून आरोग्य कर्मचारी काम करीत आहेत, अशी माहिती मडगावच्या नागरी आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. सोकोरो क्वाद्रुस यांनी दिली.

आरोग्य खात्याने लोकांना काही सूचना केल्या आहेत, त्याप्रमाणे पाणी जास्त वेळ एकाच ठिकाणी किंवा एकाच भांड्यात साठवून ठेवू नये. साठवलेले पाणी ठराविक वेळाने काढावे व त्यात ताजे पाणी भरावे.

आरोग्य कार्ड नसलेल्या कामगाराला कोणत्याही बांधकाम ठिकाणी घेऊ नये असेही आरोग्य खात्याने सूचित केले आहे. साथीचे रोग पसरण्याची भीती असलेली ठिकाणे म्हणजे मोतीडोंगर व फातोर्डातील चंद्रवाडो. या परिसरातील लोकांनी जास्त काळजी घ्यावी, असेही आरोग्य खात्याने निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT