Mapusa Bodgeshwar Jatrotsav FDA Raid Dainik Gomantak
गोवा

Mapusa FDA Raid: बोडगेश्‍‍वर जत्रोत्सवात FDA चे ‘वरातीमागून घोडे’, अंतिम क्षणी जाग; सात दुकाने केली बंद, दंडात्मक कारवाई

Bodgeshwar Jatrotsav FDA Raid: जत्रोत्‍सवात ‘एफडीए’ने जवळपास दहा आस्थापनांना परवानगी दिली होती. मात्र कुठल्याच आस्थापनाला किचन थाटण्यास मान्‍यता दिली नव्हती.

Sameer Panditrao

Mapusa Bodgeshwar Jatrotsav FDA Raid

म्हापसा: येथील श्री बोडगेश्‍‍वर देवस्‍थानच्‍या जत्रोत्सवात थाटलेल्या खाद्यपदार्थांच्‍या आस्थापनांवर आज सोमवारी (ता. २०) ‘एफडीए’ने कारवाई केली. मात्र, मुख्य आठवडाभराचा जत्रोत्सव संपुष्टात आल्यानंतर शेवटच्या क्षणी ही कारवाई म्हणजे ‘तोंडाला पाने पुसण्‍याचा प्रकार’ असल्‍याची चर्चा सुरू झाली आहे.

जत्रोत्‍सवात ‘एफडीए’ने जवळपास दहा आस्थापनांना परवानगी दिली होती. मात्र कुठल्याच आस्थापनाला किचन थाटण्यास मान्‍यता दिली नव्हती. आजच्या पाहणीवेळी गोबी मंच्युरियन व बिर्याणी अत्यंत गलिच्छ व अस्वच्छ वातावरणात बनविली जात असल्याचे आढळून आले.

जत्रोत्सवास्थळीच परस्पर स्वतंत्र किचन थाटून अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ बनवून ते आस्थापनांवर विक्री केले जात होते. त्यामुळे संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली.

सात दुकाने केली बंद

‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना दिरंगाने कारवाई केल्‍याबाबत विचारले असता त्‍यांनी सांगितले की, आम्‍ही १५ जानेवारीला पाहणी केली होती. तेव्हा संबंधितांना स्वच्छता राखण्याबरोबरच आवश्यक खबरदारी घेण्यास सांगून नोटिसा बजावल्या होत्या. परंतु आज केलेल्‍या पाहणीत अस्वच्छ जागेत बिर्याणी आणि गोबी मंच्युरियन यांसारखे खाद्यपदार्थ बनविले जात असल्‍याचे आढळून आले. त्‍यामुळे सात दुकाने बंद केली.

जत्रोत्‍सवात चिकनचे दुकान

जत्रोत्सवात हलालप्रमाणित चिकनविक्री करणारे एक दुकान थाटण्यात आले आहे. मुळात हिंदू श्रद्धास्‍थान असलेल्या ठिकाणी हलालप्रमाणित खाद्यपदार्थांची विक्री करणे म्हणजे हिंदूच्या भावना दुखावल्यासारखे आहे. यासंदर्भात काही हिंदूप्रेमींनी आज सकाळी म्हापसा पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. त्‍यांनी मागणी केली की, हलालप्रमाणित स्टॉल्स जत्रोत्सवातून हटवावे. सायंकाळी श्री बोडगेश्‍‍वराला समस्या निवारण करण्‍यासाठी गाऱ्हाणे घातले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT