Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa FDA Raid: एफडीएची फास्ट फूड दुकानांवर कारवाई, हॉटेल रेस्टॉरन्टसह 10 आस्थापनांना ठोकले टाळे

FDA Raid At Mapusa Market: म्हापसा येथील जुने मार्केट (अलंकार थिएटर) परिसरातील फास्ट फूड दुकानांवर एफडीएने छापा टाकला.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: येथील जुने मार्केट (अलंकार थिएटर) परिसरातील फास्ट फूड दुकानांवर एफडीएने छापा टाकला. तसेच अस्वच्छ जागेतील काही फास्ट फूड बंद करून शिजलेल्या वस्तू यावेळी जप्त करण्यात आल्या. बुधवारी सायंकाळी एफडीएने अचानक ही कारवाई करीत, येथील फास्ट फूड स्टॉल्सची तपासणी केली.

येथील जवळपास ७० टक्के फास्ट फूड व हॉटेल रेस्टॉरंट दुकाने अस्वच्छतेमुळे बंद करण्यात आली. यापूर्वी देखील येथील दुकाने बंद करण्यात आली होती.

उपलब्ध माहितीनुसार, एफडीएकडून सध्या धाड सत्र सुरू आहे. बुधवारी सायंकाळी अलंकार थिएटरजवळील खाद्यपदार्थ दुकानांची पाहणी एफडीएकडून करण्यात आली.

अन्न व औषधे प्रशासनाने छापा टाकून रेस्टॉरन्ट व फास्टफूड मिळून एकूण १० आस्थापने बंद केली. ही आस्थापने अस्वच्छ तसेच असुरक्षित असे खाद्यपदार्थ बनवत होती, असे अधिकाऱ्यांना पाहणीवेळी आढळले.

हॉटेल रेस्टॉरन्ट मिळून १० आस्थापने बंद

१. बुधवारी २ रोजी एफडीएच्या पथकाने म्हापशातील अलंकार थिएटर (जुना बाजार) आणि आंगड भागातील फास्टफूड व रेस्टॉरन्टची पाहणी केली.

२. यातील ९ फास्टफूड व हॉटेल रेस्टॉरन्ट मिळून १० आस्थापने बंद करण्याचे निर्देश प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिले. तसेच अनुपालन अहवाल सादर करण्याची सूचना केली.

३. ही फास्टफूड व रेस्टॉरन्ट अस्वच्छ अशा स्थितीत सुरू होती. तसेच फास्टफूडमधील पदार्थांमध्ये आरोग्यास हानीकारक असा रंग वापरला जात होता.

४. अन्न व औषधे प्रशासनाच्या संचालक श्‍‍वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर गोवा अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, लेनीन डिसा, अमीत मांद्रेकर व इतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT