food safety Goa Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: ना परवाना, ना स्वच्छता! मडगावात FDA ची मोठी कारवाई; दोन उत्पादन युनिट सील, बड्या रेस्टॉरंटला नोटीस

FDA Raid Madgaon: या तपास मोहिमेदरम्यान आरोग्य आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन उत्पादन युनिट्स आणि एका रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आलीये

Akshata Chhatre

मडगाव: दक्षिण गोवा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सासष्टी तालुक्यात नुकतीच अन्न व्यवसाय आस्थापनांची तपासणी मोहीम चालवली. या तपास मोहिमेदरम्यान आरोग्य आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन उत्पादन युनिट्स आणि एका रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आलीये.

बेकरीचे कामकाज त्वरित थांबवण्याचे निर्देश

एफडीएच्या पथकाने केलेल्या तपासणीत धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. पहिली कारवाई एका बेकरी युनिटवर करण्यात आली. ही बेकरी अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत सुरू होती. बेकरीत भांडी धुण्याची सुविधा नव्हती, जमिनी घाणेरड्या होत्या, भिंतींवरचा रंग उडालेला होता, वायरिंग सैल झालं होतं आणि साठवणुकीसाठी वापरले जाणारे ट्रे देखील अस्वच्छ होते. याशिवाय, बेकरी मालकाने कामगारांचे आरोग्य प्रमाणपत्र आणि पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र देखील एफडीएच्या पथकासमोर सादर केलं नाही. यामुळे एफडीएने बेकरीचे कामकाज त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आणि नियमांचे पालन केल्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. 

युनिटमधील २० हजार रुपयांचे अन्नपदार्थ जप्त

एफडीएकडून करण्यात आलेल्या कारवाईत  चिप्स बनवण्याच्या युनिटवर कारवाई करण्यात आली. हे युनिट फूटपाथवर कोणतीही वॉशिंग किंवा एग्झॉस्ट सुविधेशिवाय अन्न शिजवत असल्याचे आढळून आले.

येथील खाद्यपदार्थांवर योग्य लेबल नव्हते आणि या युनिटकडे वैध परवाना देखील नव्हता. यापूर्वी सूचना देऊनही चिप्स बनवण्याचा हा व्यवसाय सुरू होता. एफडीएने या युनिटमधील २० हजार रुपयांचे अन्नपदार्थ जप्त करून ते नष्ट करण्याचे आदेश दिलेत तसेच, परवाना मिळेपर्यंत कामकाज थांबवण्यास सांगितले आहे.

मडगाव मार्केटमधील रेस्टॉरंटची तपासणी

याशिवाय, मडगाव मार्केटमधील एका रेस्टॉरंटचीही तपासणी करण्यात आली. हे रेस्टॉरंट अत्यंत वाईट स्थितीत आढळले. तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसून आली, ज्यामुळे एफडीएने रेस्टॉरंट मालकाला त्वरित हॉटेलमध्ये सुधारणा करण्याची नोटीस बजावली आहे. शिवाय नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही दुकानावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT