FDA Raid Mapusa Dainik Gomantak
गोवा

FDA Raid Mapusa: म्हापशात 'एफडीए'ची अन्नप्रक्रिया युनिट्‌सवर कारवाई; एकास 10 हजार रूपयांचा दंड

FDA inspection Goa: अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणी पथकाने तीन बेकरी व मिठाई उत्पादन करणाऱ्या युनिट्सची तपासणी केली. दरम्यान, एका युनिटमध्ये अस्वच्छ परिस्थितीत उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणी पथकाने तीन बेकरी व मिठाई उत्पादन करणाऱ्या युनिट्सची तपासणी केली. दरम्यान, एका युनिटमध्ये अत्यंत गलिच्छ आणि अस्वच्छ परिस्थितीत उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले.

गावसावाड-म्हापसा येथील गणेश बेकरीत अस्वच्छ परिस्थितीत उत्पादन सुरू असल्याचे आढळल्याने पथकाने तत्काळ उत्पादन थांबवण्याचे आदेश दिले तसेच त्यांच्या किरकोळ विक्री केंद्राला अन्न सुरक्षा कायदा २००६ च्या कलम ६९ अंतर्गत १०,००० रुपये दंड ठोठावला. या पथकात रिचर्ड नोरोन्हा, अमित मांद्रेकर आणि लेनिन डिसा यांचा समावेश होता.

तपासणीदरम्यान मोयरा येथील जे.जे. बेकरीमध्ये स्वच्छतेचे निकष पाळले जात असल्याचे आढळले. श्री गणेश रंका फूड्स येथे किरकोळ स्वरूपाचे गैरपालन आढळल्याने सुधारणा नोटीस बजावण्यात आली.

तर म्हापसा येथे गणेश बेकरीत अत्यंत अस्वच्छ उत्पादन परिस्थितीमुळे या युनिटवर कारवाई करून ते तत्काळ बंद करण्यात आले, तसेच १० हजार रुपये दंड आकारण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT