FDA Raid X
गोवा

FDA Raid: दिवाळीसाठी मिठाई घेताय? मग काळजी घ्या! गोव्यात ‘एफडीए’कडून अस्वच्छ कलाकंद, मावा, बर्फी जप्त

FDA Raid Goa: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध खात्याने दक्षिण गोव्यात गुरुवारी कारवाई केली. दवर्लीत गाडीत ठेवण्यात आलेली ७८ हजारांची मिठाई जप्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध खात्याने दक्षिण गोव्यात गुरुवारी कारवाई केली. दवर्लीत गाडीत ठेवण्यात आलेली ७८ हजारांची मिठाई जप्त केली. याशिवाय चार युनिटची तपासणी करत एका युनिटला अस्वच्छतेसाठी दंड करण्यात आला. नुवे येथे ३२ हजारांचा मावा जप्त करण्यात आला.

अन्न व औषध खात्याच्या अधिकाऱ्यांकडून उत्सवाच्या काळात चांगले खाद्यपदार्थ नागरिकांना मिळावे यासाठी पदार्थ बनवणाऱ्या युनिट्‌सची तपासणी केली जात आहे. दवर्ली येथे स्थानिक मिठाई उत्पादकांना मावा पुरवठा करणाऱ्या वाहनाची तपासणी करण्यात आली असता, दुधाच्या उत्पादनांसाठी आवश्यक योग्य साठवणुकीची सोय दिसून आली नाही.

कलाकंद, बर्फी व इतर मिठाईंच्या पिशव्यांवर आवश्यक माहितीची नोंद नव्हती. अन्न व औषध खात्याने कलाकंदच्या प्रत्येकी १० किलोच्या ५ पिशव्या, बर्फीच्या प्रत्येकी १० किलोच्या ७ पिशव्या यासह इतर मिठाईंच्या ५ किलोच्या ६ पिशव्या अशा ६८ हजारांचा माल जप्त करत नष्ट करण्यात आला.

या मिठाईंच्या पिशव्यांवर कालबाह्य तारखा होत्या. उल्लेख करण्यात आलेला ‘एफएसएसएआय’ परवाना क्रमांक निष्क्रीय असल्याचेही आढळून आले होते. याशिवाय स्वच्छता आणि स्वच्छताविषयक परिस्थिती तपासण्यासाठी ४ खाद्यपदार्थ उत्पादन युनिट्सची तपासणी करण्यात आली. यावेळी तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. एका ठिकाणी अस्वच्छ परिस्थितीत काम सुरू असल्याने या युनिटला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

यानंतर नुवे परिसरातील उत्पादन युनिटची तपासणी करण्यात आली. यावेळी योग्य लेबल्स नसलेला, कालबाह्य तारीख असलेला सुमारे ४३ हजार रुपये किमतीचा १० किलो मावा जप्त करण्यात आला व हा साठा नष्ट करण्यात आला. या कारवाईत अन्न व औषध खात्याच्या अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT