FC Goa Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: एफसी गोवाची नजर दुसऱ्या क्रमांकावर; चेन्नईयीन एफसीविरुद्ध रंगणार सामना

Indian Super League: एफसी गोवासाठी स्पर्धेतील बाकी दोन लढतीत जर-तर खूपच महत्त्वाचे आहे. प्रत्येकी 21 सामने खेळल्यानंतर मुंबई सिटीचे 47 गुण, मोहन बागानचे 45 गुण, तर एफसी गोवाचे 42 गुण आहेत.

Manish Jadhav

Indian Super League: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत रविवारी (ता. 14) फातोर्ड्यात एफसी गोवाने चेन्नईयीन एफसीला हरविले आणि सोमवारी (ता. 15) मोहन बागानला हरवून मुंबई सिटीने लीग विनर्स शिल्डचा मान मिळविल्यास गोव्यातील संघ स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावेल आणि थेट उपांत्य फेरी गाठेल.

दरम्यान, एफसी गोवासाठी स्पर्धेतील बाकी दोन लढती खूपच महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकी 21 सामने खेळल्यानंतर मुंबई सिटीचे 47 गुण, मोहन बागानचे 45 गुण, तर एफसी गोवाचे 42 गुण आहेत. सुरवातीला उल्लेखलेले जर-तर प्रत्यक्षात आल्यास साखळी फेरीअंती एफसी गोवा व मोहन बागान यांचे समान 45 गुण होतील. यंदा स्पर्धेत एकमेकांविरुद्धच्या लढतीत एफसी गोवा सरस असल्याने कोलकत्यातील संघ तिसऱ्या स्थानी राहील व त्यांना प्ले-ऑफ बाद फेरीत खेळावे लागेल. मुंबई सिटी व मोहन बागान यांच्यातील सामना बरोबरीत राहिल्यास साखळी फेरीअंती मुंबईतील संघ शिल्ड विजेता, तर कोलकत्यातील संघ उपविजेता ठरेल आणि एफसी गोवाला प्ले-ऑफ बाद फेरीत खेळावे लागेल.

दुसरीकडे, फातोर्ड्यात रविवारी एफसी गोवा व चेन्नईयीन एफसी यांच्यासाठी साखळी फेरीतील शेवटचा सामना असेल. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ सलग सहा सामना अपराजित आहेत, तर ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसीने ओळीने तीन सामने जिंकून स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. सध्या त्यांचे 21 सामन्यांतून 27 गुण असून ते सहाव्या क्रमांकावर आहेत.

विजय अत्यावश्यक: मार्केझ

सामन्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी पत्रकार परिषदेत एफसी गोवाचे प्रशिक्षक मार्केझ यांनी सांगितले, की `आम्हाला जिंकायचेच असून विजय अत्यावश्यक आहे. समजा, रविवारी आम्ही जिंकलो नाही आणि कोलकत्यात (मोहन बागानविरुद्ध) मुंबईने (सिटी) विजय नोंदविल्यास आमच्यावर पश्चातापाची वेळ येईल. चेन्नईयीनसाठीही बाकी एक सामना महत्त्वपूर्ण आहे. तुलनेत आमच्यासाठी लढत खूप महत्त्वाची आहे, कारण आम्हाला अजूनही साखळी फेरीअंती दुसऱ्या स्थानी राहण्याची चांगली संधी आहे. जरी आम्ही इतर निकालावर अवलंबून असलो, तरी आम्हाला जिंकावेच लागेल.`

संघावर यलो कार्डचे संकट

एफसी गोवासमोर खेळाडूंच्या यलो कार्डचे संकट आहे. संघाच्या बचावफळीत स्थिरावलेला सेंटर बॅक खेळाडू निम दोरजी तमांग स्पर्धेत चार यलो कार्डमुळे चेन्नईयीन एफसीविरुद्ध निलंबनामुळे खेळू शकणार नाही. याशिवाय नोआ सदोई, महंमद यासीर, ओडेई ओनाइंडिया, रॉलिन बोर्जिस या प्रमुख खेळाडूंना आतापर्यंत तीन यलो कार्ड मिळाली आहेत, त्यामुळे त्यांच्यावरही संभाव्य निलंबनाची टांगती तलवार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT