Fatorda  Dainik Gomantak
गोवा

Fatorda News : फातोर्डात सोलर पाॅवरवरील विहिरी खोदण्यास जलस्रोतमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

Fatorda News : २४ लाखांचा खर्च अपेक्षित

गोमन्तक डिजिटल टीम

Fatorda News : सासष्टी, फातोर्डा मतदारसंघात सोलर पॉवर पंपावरील १६ विहिरी खोदण्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी (ता.१७) आगाळी-फातोर्डा इथे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

याप्रसंगी लिंडन परेरा, राजू नाईक, पूजा नाईक, निमिषा फालेरो व इतर नगरसेवक उपस्थित होते.सध्या आगाळीसह बोर्डा, अंबाजी, चंद्रवाडो, मुगाळी, मिराभाट येथे या विहिरी प्रथम खोदल्या जातील.

त्यासाठी एकूण २४ लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. बाकीच्या विहिरींचे खोदकाम टप्प्याटप्प्याने केले जाईल, असे ते म्हणाले.

जिथे शेतकरी शेती करतात, भाजीपाला उगवतात त्या शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे, हा मुख्य उद्देश आहे.

जमिनीच्या खाली जे पाणी आहे त्याचा सदुपयोग शेतकऱ्यांना करता यावा हा त्यामागचा हेतू आहे. फातोर्डा या मतदारसंघात शेतकरी, गवळी समाजही राहतो. त्यामुळे समाजातील सर्व स्तरावरील लोकांना न्याय मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

जलस्रोत खाते शेतकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देते. आपल्या खात्याने गोव्यात हजारपेक्षा जास्त विहिरी खोदून व व्यवस्थित बांधून दिलेल्या आहेत. आता फातोर्डा येथील विहिरींची देखभाल जलस्रोत खात्यामार्फत केली जाईल.एक विहीर खोदून तयार करायला दोन महिने लागतील. सोमवारपासून या विहिरींचे काम सुरू होईल.

- सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT