Sport Ground Dainik Gomantak
गोवा

Sport Ground : फातोर्डातील बोर्डा येथे साकारणार फुटसाल मैदान

Sport Ground : खुल्या जागांचा योग्य वापर करण्याची सरदेसाई यांची ग्वाही

गोमन्तक डिजिटल टीम

Sport Ground :

सासष्टी, पालिकेच्या प्रभाग ९ मधील बोर्डा येथे पुढील सहा महिन्याच्या आत अद्ययावत फुटसाल मैदान साकारणार आहे. या मैदानाच्या कामाचा शुभारंभ आज फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी सरदेसाई यांनी सांगितले की, फातोर्डातील सार्वजनिक खुल्या जागांचा योग्य प्रकारे वापर करण्याचा आमचा उद्देश आहे. फुटसाल हा सध्या युवकांचा आवडता खेळ असून तो सर्वांना एकत्र आणतो. शिवाय फुटबॉल गोमंतकीयांच्या रक्तात आहे.

काही लोकांना इथे बाग हवी आहे, पण मडगाव व फातोर्डात ज्या बागा आहेत त्यांची देखभाल होत नाही हे आम्ही पाहतो. इथे फुटसाल मैदानाबरोबरच वॉकिंग ट्रॅकची देखील व्यवस्था केली जाईल.

आता इथे फुटसाल मैदानासाठी काही लोकांचा विरोध असेल, पण सहा महिन्यांनंतर याच लोकांना हा परिसर आवडू लागेल असेही सरदेसाई यांनी सांगितले. फुटसाल मैदानाची देखभाल व्ही फॉर फातोर्डातर्फे केली जाईल. असे सरदेसाई यांनी जाहीर केले.

हे मैदान होऊ नये म्हणून मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी बरेच प्रयत्न केल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. मात्र आम्ही हा विषय हातातून निसटून जाऊ दिला नाही, असे ते म्हणाले.

४९ लाख रुपये खर्च

येथील नगरसेवक रवींद्र (राजू) नाईक यांनी सांगितले की, ही एकूण १५०० चौरस मिटर जागा असून फुटसाल मैदान ६०० चौरस मीटर जागेत होईल. त्यासाठी ४९ लाख रुपये खर्च होईल. गोवा जेव्हा मुक्तीची ६० वर्षे साजरा करीत होता तेव्हा सरकारने फातोर्डा व मडगावसाठी एक कोटी रुपये मंजूर केले होते.

तेव्हा दोन्ही ठिकाणी फुटसाल मैदान बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आपण ही जागेत फुटसाल मैदान तयार करण्यासाठी आनंद तिंबलो कुटुंबीयांकडून ना हरकत दाखला घेतला आहे.

नगरपालिकेतही या संदर्भात ठराव मंजूर झाला आहे, असे त्यांनी सांगितले. हे काम जीसुडामार्फत करण्यात येत असून राऊल रॉड्रिग्स हे कंत्राटदार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी गोवा फॉरवर्डचे नगरसेवक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT