St. Xaviers Exposition Goa Dainik Gomantak
गोवा

St. Francis Xavier: "गोयच्या सायबाबद्दल हे ऐकून भावना दुखावल्या की नाही?" वेलिंगकरांच्या वक्तव्यावर सरदेसाई भडकले, मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न!

गोमन्तक डिजिटल टीम

St. Xavier's Exposition Ceremony Goa, India

येत्या नोव्हेंबर महिन्यात २१ तारखेपासून ते ४ जानेवारी पर्यंत सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांच्या अवशेषांचे प्रदर्शन होणार आहे. हे प्रदर्शन होण्याआधी झेवियर्स यांच्या अवशेषांची चाचणी व्हावी अशी मागणी वेलिंगकरांनी केली आणि यावरून राज्यात वादंग निर्माण झाला.

आज सुभाष वेलिंगकर यांनी स्वतः समोर येत माध्यमांसमोर मत व्यक्त केलं, ते म्हणतात की इतिहासाबद्दल कोणाच्याही मनात प्रश्नचिन्ह उभं राहू नये म्हणून टेक्नॉलॉजीची मदत घेण्यात काही गैर नाही. त्यांना कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत तर केवळ सत्य सर्वांसमोर आणून या वादाला पूर्णविराम लावायचा आहे.

सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या वक्तव्यावर फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपले मत व्यक्त केले आहे. सरदेसाई यांच्या मते गोव्यात अनेक लोकं सेंट फ्रान्सिस झेवियर्स यांच्यावर श्रद्धा ठेवतात किंवा गोव्यात त्यांना गोयचो सायब असं म्हटलं जातं.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गोव्यात होणाऱ्या सेंट झेवियर्स यांच्या अवशेषांच्या सोहळ्याला सरकारचा पूर्ण पाठिंबा मिळेल असं वक्तव्य केलं होतं, हे वर्ष गोव्यासाठी महत्वाचं आहे असंही ते म्हणाले होते. एवढंच नाही तर प्रधानमंत्री मोदींनी झेविर्यस यांना शांततेचं प्रतीक मानलं होतं.

मग आता अशा काहीबाही वक्तव्यांमुळे जनता नाराज असताना राज्य सरकारला काहीच वाटत नाहीये का? किंबहुना यामुळे सरकारच्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत का? आणि सरकारला देखील वाईट वाटले असेल तर यावर काहीच हालचाल का केली जात नाहीये? असे रोखठोक प्रश्न सरदेसाई यांनी उभे केलेत.

विजय सरदेसाई यांच्या मतानुसार राज्यात शासन करणारे भाजप सरकार या मुद्याकडे दुर्लक्ष करून एकार्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव फोल ठरवत आहे, मात्र यात नेमका खरेपणा काय याचे उत्तर केवळ राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतच देऊ शकतात असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर देण्यास भाग पडले आहे, या विषयावर आता मुख्यमंत्री समोर येऊन प्रतिक्रिया देईल की नाही हे पाहावं लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सांतिनेजच्या ‘त्या’ अतिक्रमणाचा निकाल तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला राखून; ‘गोमन्तक’ने केला होता पाठपुरावा !

Rashi Bhavishya 4 October 2024: 'या' राशींच्या लोकांना होणार मोठा धनलाभ!! जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Student Assault Case: कुंकळ्ळीतील विद्यार्थिनी मारहाण प्रकरणी तपास अधिकारी बदला; शिक्षिकांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Kone Priole Accident: कोने-प्रियोळ येथे मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा अपघात; महिला ठार

Jagadish Jairam Shet Verekar: मराठी तथा कोकणी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी जगदीश जयराम शेट वेरेकर यांची प्राणज्योत मालवली!

SCROLL FOR NEXT