MLA Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Jobs For Goans: सरदेसाईंनी गाेमंतकीयांसाठी उठवला आवाज! खासगी उद्योगात 80 टक्‍के रोजगार सक्‍तीची मागणी, सचिवांना पत्र

Jobs For Goans: गाेव्‍यात कार्यरत असलेल्‍या कंपन्या स्‍थानिकांना कामावर घेतात की नाही याची खात्री सरकारने केली पाहिजे.

सुशांत कुंकळयेकर

Jobs For Goans

गोव्‍यातील एका अग्रगण्‍य अशा औषध निर्मिती प्रकल्‍पाच्‍या नोकर भरतीसाठी भोईसर-महाराष्‍ट्र येथे मुलाखती ठेवल्‍याने गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी त्‍याला आक्षेप घेत गोव्‍यातील युवकांना राेजगारांपासून परालंबित करण्‍याचे हे कारस्‍थान असा आरोप केला आहे. ही नोकरभरती तत्‍काळ थांबवावी अशी मागणी करणारे पत्र त्‍यांनी गोवा राज्‍याच्‍या मुख्‍य सचिवांना पाठविले आहे.

गोव्‍यातील उद्याेगात 80 टक्‍के गोमंतकीयांना रोजगार देण्‍याच्‍या तत्‍वाच्‍या विरोधात या कारखान्‍याची ही कृती असल्‍याचे सरदेसाई यांनी म्‍हटले आहे.

गोव्‍यातील तरुणांचे हितसंबंध राखण्‍यासाठी गोव्‍यातील उद्योगात या तरुणांना 80 टक्‍के रोजगार मिळणे आवश्‍‍यक असून यासाठी उद्योगावर सक्‍ती करावी अशा आशयाचे एक विधेयक विधानसभेत आणले होते.

हे विधेयक सध्‍या प्रलंबित आहे. हे विधेयक अंमलात आणून त्‍याची त्‍वरित अंमलबजावणी करण्‍याची गरज सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

गाेव्‍यातील तरुणांच्‍या हक्‍काच्‍या असलेल्‍या नोकर्‍या राज्‍याबाहेरील लाेकांना देणे हा गोवेकरांवर केलेला अन्‍याय आहेच त्‍याशिवाय गोवेकरांचा हा अपमानही आहे असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

गोमंतकीयांना खासगी उद्याेगातील नोकर्‍यात 80 टक्‍के आरक्षण मिळावे यासाठी गोवा फॉरवर्ड मागची कित्‍येक वर्षे मागणी करत आहे. यासंदर्भात वेळोवेळी विधानसभेतही आवाज उठविला आहे.

खासगी उद्योगांना गोमंतकीय युवकांना नोकर्‍या न देण्‍यापासून रोखण्‍यास सरकारला अपयश आले आहे. गोव्यातील युवकांना रोजगारात प्राधान्य देणारी धोरणे सरकारने लागू केली पाहिजेत. तसेच या युवकांना पुरेसे कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्‍‍यक आहे.

मात्र या बाबतीत सरकारला पूर्णत: अपयश आल्‍याचे त्‍यांनी आपल्‍या पत्रात म्‍हटले आहे.

गाेव्‍यात कार्यरत असलेल्‍या कंपन्या स्‍थानिकांना कामावर घेतात की नाही याची खात्री सरकारने केली पाहिजे. आणि जर तसे होत नसेल तर अशा कंपन्‍यांवर कठोर कारवाई करण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. तसे न केल्‍यास गोव्‍यातील तरुण रोजगारापासून अलिप्‍त रहातील याकडे त्‍यांनी लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT